शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दोन महिन्यांनंतरही ‘विधी’चा निकाल नाही

By admin | Updated: June 29, 2016 00:51 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला विधी अभ्यासक्रमाचे निकाल दोन महिन्यांनंतरही जाहीर करता आलेले नाहीत.

पुणे : परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत निकाल लावणे अपेक्षित असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला विधी अभ्यासक्रमाचे निकाल दोन महिन्यांनंतरही जाहीर करता आलेले नाहीत. परीक्षा विभाग व ‘विधी’च्या प्राध्यापकांमध्ये काही कारणांवरून बेबनाव निर्माण झाल्याने निकालाला विलंब होत असल्याचे समजते.विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आतापर्यंत बहुतेक अभ्यासक्रमांचे निकाल विक्रमी वेळेत जाहीर केले आहेत. दर वर्षी विलंब होणाऱ्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्यातही विभागाने यंदा आघाडी घेतली. तसेच हे निकाल जाहीर झाल्यानंतर त्याबाबत विद्यार्थ्यांकडून फारशा तक्रारीही आल्या नाहीत. एकीकडे इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सुखद अनुभव येत असताना विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मात्र निकालाच्या प्रतीक्षेने व्याकुळ झाले आहेत. विद्यापीठाकडून विधीच्या तीन वर्षे व पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमांची परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात आली. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात बहुतेक सर्व विषयांची परीक्षा संपली होती. त्यानंतर ४५ दिवसांत म्हणजे साधारणपणे मे महिन्याच्या मध्यापर्यंत निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाचे तिन्ही वर्षांचे, तर पाच वर्षे कालावधीच्या तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या वर्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. याबाबत परीक्षा विभागात चौकशीसाठी गेल्यानंतर ‘तुमच्या शिक्षकांनाच लवकर पेपर तपासायला सांगा,’ अशी उत्तरे मिळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. प्राध्यापक व परीक्षा विभागात काही वाद असल्याने विलंब होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.येत्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रकही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये आॅक्टोबरच्या अखेरीस पहिले सत्र संपणार आहे. अद्याप निकाल न लागल्याने पुढील वर्षाचे वर्ग सुरू होण्यासाठी आॅगस्ट महिना उजाडेल. त्यामुळे अध्यापनासाठी केवळ दोन ते अडीच महिन्यांचा वेळ मिळेल. या कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागेल. तसेच, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘एलएलएम’साठी इतर ठिकाणी प्रवेश परीक्षा दिल्या आहेत. निकाल लागण्यापूर्वी ही प्रवेशप्रक्रिया संंपून गेल्यास या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे विधीचे निकाल तातडीने लावावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे केली आहे.>निकाल आज जाहीर करूनिकालाला विलंब होत असल्याबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, बुधवारी विधीचे सर्व निकाल जाहीर केले जातील, असे सांगितले. तसेच, विधीच्या फॅकल्टीशी संबंधित काही मुद्दे असल्यामुळे निकालाला विलंब झाल्याचेही डॉ. चव्हाण यांनी मान्य केले.