शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उपचारानंतर ‘साडेसाती’ रुग्णालयातच! रुग्णांच्या चपलांचा खच, ‘स्वाराती’ला अंधश्रद्धेचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 04:44 IST

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालय (स्वाराती) अंधश्रद्धेने घेरले आहे. या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आलेले रूग्ण व त्यांचे नातेवाईक रूग्ण तंदुरुस्त होताच आपले पायताण ‘साडेसाती’ समजून रूग्णालयातच सोडून जाऊ लागले आहेत.

 - अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई (जि. बीड) : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालय (स्वाराती) अंधश्रद्धेने घेरले आहे. या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आलेले रूग्ण व त्यांचे नातेवाईक रूग्ण तंदुरुस्त होताच आपले पायताण ‘साडेसाती’ समजून रूग्णालयातच सोडून जाऊ लागले आहेत. रोजच पादत्रानांचा मोठा खच पडू लागल्याने रूग्णालय प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.मराठवाड्यातील रूग्णांसाठी ‘स्वाराती’आधार केंद्र्र आहे. ग्रामीण भागातून येणाºया रूग्णांची संख्या येथे मोठी आहे. दररोज किमान एक हजारावर रूग्ण उपचारासाठी येतात. एवढ्याच रूग्णांना दररोज रूग्णालयातून सुटी दिली जाते. उपचार झाल्यानंतर परतताना चपला रूग्णालयातच सोडुन जाणाºया रुग्णांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. ‘रूग्णालयात आलो म्हणजे आपल्या मागे साडेसाती होती. ती पुन्हा नको’, या अंधश्रद्धेतून हा प्रकार वाढाल्याचे माहिती समोर आली आहे. हा प्रकार रोखण्यासाठी सुरक्षारक्षक व कर्मचारी प्र्रयत्न करीत असले तरी त्याला रुग्णांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्णालय प्रशासन हैराण झाले आहे.रोज ३०० रुग्ण होतात दाखलबाह्य रूग्ण तपासणीसाठी जवळपास ७०० रूग्ण दररोज येतात. रोज दाखल होऊन उपचार घेणाºया रूग्णांची संख्या ३०० च्या जवळपास आहे. एवढ्याच रूग्णांना रोज सुट्टी दिली जाते. त्यामुळे पादत्रानांचा मोठा खच पडत आहे.‘अंनिस’ करणार जनजागृतीजग सध्या झपाट्याने बदलत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान गतिमान होत असताना, अंधश्रद्धेपोटी असे कृत्य घडणे हे दुर्देवी आहे. अशा अनिष्ट प्रथा मोडित काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती जनजागृतीचे कार्य करील.- प्रा. डॉ. डी. एच. थोरात,अंनिसचे जेष्ठ पदाधिकारीहा नवीन पायंडा रूग्णालयात पडल्याने आम्हीही हैराण झालो आहोत. सुरक्षा रक्षकांसह इतर कर्मचाºयांना असे कृत्य करणाºयांना मज्जाव करण्यास सांगितले आहे.- डॉ.दिनकर केकान, उप अधीक्षक, स्वाराती रूग्णालय, अंबाजोगाई

टॅग्स :hospitalहॉस्पिटल