शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांनंतरही आव्हाने कायम

By admin | Updated: November 26, 2015 03:17 IST

मुंबईतील अनेक रेस्टॉरंटमध्ये सुरक्षेच्याबाबतीत कमालीची हलगर्जी दिसत असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

रेस्टॉरंट्सच्या सुरक्षेत आजही हलगर्जीच!मॉक ड्रिलमध्ये उघड झाली अनास्थाडिप्पी वांकाणी, मुंबईमुंबईतील अनेक रेस्टॉरंटमध्ये सुरक्षेच्याबाबतीत कमालीची हलगर्जी दिसत असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या पोलिस पथकाने मॉक ड्रिल करत काही रेस्टॉरंटमध्ये बॅग ठेवल्या मात्र, या बॅग कित्येक तास तिथे पडून होत्या पण, त्याकडे रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी पाहिलेही नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरक्षेच्या संदर्भात आम्ही रेस्टॉरंट आणि फाईव्ह स्टार हॉटेल्सना वेळोवेळी नाराजी दर्शविणारे पत्र दिल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, त्याचा परिणाम होत नसल्याचे दिसून आले आहे. २६/११ च्या हल्ल्यात लिओपोल्ड कॅफेवर हल्ला झाला होता. तर पॅरीसवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यातही अनेक रेस्टॉरंटला लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या सुरक्षेवर भर देण्यात येत आहे. रेस्टॉरंटमधील कर्मचारीच सर्वात प्रथम अलर्ट देऊ शकतात. पण या ठिकाणचा अनुभव चांगला नाही. एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही रेस्टॉरंटच्या आत आणि बाहेरच्या भागात काही बॅग ठेवल्या. या बॅग कोणाच्या आहेत? अशी विचारणा येथील कर्मचारी करतात का? किंवा अलार्म वाजवतात का? याची पाहणी केली पण, कित्येक वेळ बॅग तिथेच असते मात्र, कोणीही साधी तक्रार करत नाही. अशा हॉटेल्स, आंतरराष्ट्रीय फूडच्या चेन यांना आम्ही नोटिसा बजावल्या असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. तथापि, याची दखल न घेतली गेल्यास मीडियापर्यंत ही माहिती दिली जाईल, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. पोलिस सदैव तत्पर आहेत, हा संदेश अतिरेकी कारवाया करणाऱ्यांपर्यंत जाण्यासाठी आम्ही नियमित अशा मॉक ड्रिल सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी करत आहोत. दक्षिण मुंबईच्या एटीएसच्या प्रत्येक शाखेतील कर्मचारी दररोज हॉकर्स आणि तत्सम लोकांशी संवाद साधून आहेत. या दैनंदिन बैठकीनंतर यात सहभागी होणारांची रजिस्टरवर स्वाक्षरी घेतली जाते. तर आमचे काही खास व्यक्ती हाउसिंग सोसायट्यांत नियमित चौकशी करतात. पार्किंगमधील कारचा मालक कोण आहे? याची विचारणा केली जाते. यातून हा संदेश जातो की, अतिरेकी कारवाया करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो नक्कीच पकडला जाईल.रेल्वे सुरक्षा यंत्रणा सतर्कमुंबई : २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात ५८ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आणि १0४ जण जखमी झाल्यानंतर रेल्वेकडून सुरक्षा यंत्रणेवर अधिक भर देण्यास सुरुवात झाली. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मरेवर येत्या सहा महिन्यांत २00 शस्त्रसज्ज कमांडो दाखल होणार आहेत. तर पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून दहा दिवसांपूर्वीच क्वीक रिस्पॉन्स टिम विविध स्थानकांवर तैनात करण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन दिवसाला जवळपास ७५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी ये-जा करतात. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर रेल्वे सुरक्षा दलाचे १,२00 जवान तर मध्य रेल्वे मार्गावर २,४00 जवान तैनात आहेत. लवकरच तैनात होणारे २00 कमांडो अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असतील. त्यांना सहा महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे, आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली. गर्दीच्या आणि महत्वाच्या स्थानकांवर हे जवान तैनात केले जातील. पश्चिम रेल्वेवर नऊ ‘क्वीक रिस्पॉन्स टिम’ तैनात करण्यात आल्या आहेत. या टिम चर्चगेट, मुंबई सेन्ट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, वसई, विरार, सुरत स्थानकांवर तैनात आहेत. पश्चिम रेल्वेवर तीन महिन्यानंतर आणखी तीन श्वान पथकेही येणार आहेत, असे पश्चिम रेल्वे, आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद झा सांगितले.सिएसटी स्थानकात ३00 सीसीटिव्हीहल्ल्यानंतर सीएसटी स्थानकातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली. सीसीटिव्हींच्या संख्येत वाढ करण्यात आली. त्यामुळे जवळपास ३00 सीसीटिव्ही एकट्या सीएसटी स्थानकातच असल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले. मनुष्यबळ वाढविण्यासाठी जीआरपीची धडपडसध्या ३,५00 मनुष्यबळ असणाऱ्या जीआरपीकडून मनुष्यबळ वाढविण्यासाठी धडपड सुरु आहे. प्रवाशांची संख्या पाहता मनुष्यबळ कमी पडत असून ५00 पोलिस मिळावेत यासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती, जीआरपीचे आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली. त्याचबरोबर सध्या ५00 होमगार्ड जरी असले तरी तेवढे होमगार्ड कामावर येत नाहीत. त्यामुळे या होमगार्ड ऐवजी महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे ५00 सुरक्षा रक्षक मिळावेत, असा प्रस्तावही शासनाकडे पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.कंट्रोल रुम आजही अडगळीतचमुंबई : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष कॉल्सच्या खणखणाटाने कोलमडून पडला होता. आता मात्र एकाचवेळी शेकडो कॉल आलेतरी ते हाताळत त्यावर योग्य कार्यवाही जलदगतीने केली जात आहे. हल्ल्याला सात वर्षे लोटल्यानंतरही कंट्रोल रुम अद्यावत करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे आजही दाटीवाटीच्याच ठिकाणी त्याचे काम सुरू आहे. २६/११ च्या हल्ल्यादरम्यान नियंत्रण कक्षात दोन तासांत तब्बल १४ हजार कॉल्स आले होते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे गोंधळ उडाला होता. नियंत्रण कक्ष अधिक सुसज्ज करण्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली होती. अखेर सात वर्षानंतर मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर नियंत्रण कक्षाचे कामकाज चालणार आहेत. सुसज्ज अशा आसनव्यवस्थेबरोबर सोयी सुविधांनी तो परिपूर्ण असणार आहे. नियंत्रण कक्ष हलविल्यानंतर मनुष्यबळ दुप्पट करण्यात येणार आहे, मात्र सध्या तरी दोन छोट्या खोल्यांमध्ये नियंत्रण कक्षाचे काम सुरू अहे. तिथे दीडशे कर्मचारी दाटीवाटीने काम करत आहेत. एकूण २३ कॉल्स टेकर कार्यरत आहेत. पोटमाळा तयार करण्यात आला आहे. तिथेही काही कर्मचारी काम करतात. नव्या इमारतीत नियंत्रण कक्षाचे कामकाज सुरु केल्यावर ६० कॉल्स टेकर नेमण्यात येतील, अशी माहिती उपायुक्त (अभियान) संजय बारकुड यांनी दिली. मोबाईल कंपन्यांनाचा डाटा नियंत्रण कक्षाशी जोडल्यामुळे कॉल करणाऱ्या व्यक्तीची माहिती सहज मिळवता येते. काही दिवसांपूर्वी नियंत्रण कक्षाला इसिसच्या नावाने कॉल आला होता. त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर २६/११ साठी नियंत्रण कक्षातील अधिकारी प्रत्येक कॉलवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. (प्रतिनिधी)रत्नागिरीची सागरी सुरक्षा रामभरोसे !रत्नागिरी : दहापैकी केवळ दोनच गस्तीनौका कार्यरत असल्याने रत्नागिरीची सागरी सुरक्षा रामभरोसेच असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील २६/११च्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी बुधवारी सकाळी दीड तास सागरी सुरक्षिततेची झाडाझडती घेतली. जिल्ह्याच्या सागरी हद्दीतील ३६ लँडिंग पॉइंट व अन्य संवेदनशील ठिकाणी एक कोटी खर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, अशी घोषणा त्यांनी केली. सागरी सुरक्षा भेदून २६/११ला अतिरेक्यांनी मुंबईत प्रवेश केला व मृत्यूचे तांडव घडवले होते. त्याआधी रायगडच्या दिघी येथे स्फोटके उतरवून मुंबईत १९९३मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत सागरी सुरक्षा भक्कम करण्यावर शासनाने भर दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर गस्तीसाठी विविध खात्यांच्या मिळून दहा वेगवान गस्तीनौका पुरविण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातील केवळ दोन नौका सुरू असल्याचे पालकमंत्र्यांना तपासणीत आढळून आले. भगवती बंदरातील गस्तीनौका बंद का आहेत, याबाबत त्यांनी संबंधित खात्यांकडून अहवाल मागविला आहे. (प्रतिनिधी)आधुनिक शस्त्रे व पेट्रोल पंप : सागरी किनारा सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस दलास वाढीव मनुष्यबळाबरोबरच आधुनिक हत्यारे उपलब्ध करून देण्यात येतील. गस्तीनौकांसाठी इंधन उपलब्ध व्हावे, याकरिता पेट्रोल पंप उभारण्याचा पोलीस दलाचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही वायकर यांनी दिले आहे.मुंबईतले सागरी किनारे असुरक्षितच!राज्य शासनाने मुंबईच्या किनाऱ्यांवर गस्ती घालण्यासाठी मोठा गाजावाजा करत ६९ गस्ती नौका आणल्या होत्या. मात्र त्यातील तब्बल ४३ नौका बिघडल्या असून इतर नौकाही समुद्रकिनारी धूळ खात पडल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केला आहे.आजही विनापरवाना बोटी मुंबईच्या किनाऱ्यांवर फिरत असून मुंबईकरांवर कधीही हल्ला होऊ शकते, अशी भीती तांडेल यांनी व्यक्त केली आहे. कफ परेडच्या मच्छीमारांनी १५ दिवसांपूर्वीच नरिमन पॉर्इंटच्या समुद्रात मासेमारी करताना १२ अनधिकृत ट्रॉलर्स पकडल्याचा दावा तांडेल यांनी केला. हे सर्वच ट्रॉलर्स गुजरात राज्यातील असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. मस्त्यविभागाच्या ताब्यात दिल्यानंतर दंडात्मक कारवाई करून ट्रॉलर्स सोडून दिल्याचा आरोपही तांडेल यांनी केला आहे. कामा रुग्णालयात सुरक्षेविषयी जनजागृतीमुंबई : सात वर्षांपूर्वी कामा रुग्णालयात झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या कटू आठवणी अजूनही तेथील कर्मचारी, अधिकाऱ्यांना पुसता आलेल्या नाहीत. हल्यात रुग्णालयातील दोन सुरक्षारक्षक मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्यानंतर सुरक्षेविषयी जनजागृती मोहीमच रुग्णालय प्रशासनाने हाती घेतली आहे. मृतांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. हल्ल्यात भानू नारकर आणि बबन उघाडे यांचा बळी गेला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून माता आणि बालकांचे प्राण वाचवले होते. या हल्ल्यानंतर रुग्णालयात ‘सावधानता बाळगा’, ‘कोणतीही अपरिचित गोष्ट आढळल्यास त्याची कल्पना पोलिसांना द्या’, ‘अपरिचित गोष्टींना हात लावू नका’ असे संदेश दिले जात असल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजश्री कटके यांनी दिली. डीजिटल डिसप्ले लावण्यात आले आहेत. सुरक्षारक्षकही रुग्णांना माहिती देतात. सुरक्षा भिंतीची उंची वाढवण्यात आली आहे. ८१ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. २६/११ च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सुरक्षारक्षकांचे स्मारक बांधण्यात आले आहे.