शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळेबाज ठेकेदार बाद

By admin | Updated: November 2, 2016 01:52 IST

नालेबांधणीचे काम मिळवणाऱ्या आरपीएस इंफ्रा प्रोजेक्टस या कंत्राटदाराला अखेर महापालिकेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

मुंबई : रस्ते दुरुस्तीच्या कामात घोटाळेबाज ठरल्यानंतरही नालेबांधणीचे काम मिळवणाऱ्या आरपीएस इंफ्रा प्रोजेक्टस या कंत्राटदाराला अखेर महापालिकेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यापूर्वी पालिकेने याच कंत्राटदाराला दिलेले उड्डाणपूल बांधण्याचे कंत्राट न्यायालयाच्या आदेशाने रद्द करण्यात आले आहे. रस्तेदुरुस्तीच्या ३५२ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आरपीएस इंफ्रा प्रोजेक्टस हा ठेकेदार दोषी आढळला आहे. त्याच्या विरोधात पालिकेने गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रियाही सुरू केली. मात्र ही कारवाई सुरू असतानाच या कंत्राटदाराला दोन उड्डाणपूल बांधण्याचे कंत्राट देण्यात आले. पालिकेच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर हे काम रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.त्यानुसार ते काम रद्द केल्यानंतर त्यापाठोपाठ पालिकेने एप्रिल महिन्यात चेंबूर आणि मानखुर्द परिसरात नाले रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम दिले होते. हे कामही आता रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. मात्र घोटाळेबाज ठेकेदाराला काम देऊन ते रद्द करणे या प्रक्रियेत बराच वेळ गेल्याने उड्डाणपुलापाठोपाठ नालेबांधणीचे कामही लांबणीवर पडले आहे. (प्रतिनिधी)>नाल्याचे रुंदीकरण रखडलेया कंत्राटदाराचे काम रद्द करण्याबाबत पालिका प्रशासनाने विधि विभागाचा अहवाल मागवला होता. त्यावर हे कंत्राट तत्काळ रद्द करावे अशी शिफारस विधि विभागाने जुलै महिन्यात केली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी पालिकेने हे काम रद्द करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडला. पालिकेच्या या दिरंगाईमुळे या नाल्यांचे रुंदीकरण रखडले आहे.