शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तापालटानंतरही खर्चाची परंपरा कायम

By admin | Updated: November 13, 2014 00:57 IST

राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे नव्याने सत्तारुढ झालेले भाजप सरकारचे मंत्री सांगत असले तरी खर्चात मात्र कुठलीही काटकसर होताना दिसत नाही. आघाडी सरकारच्याच पावलावर पाऊल

अधिवेशनाची तयारी : देखभाल दुरुस्तीसाठी लागणार सात कोटीनागपूर: राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे नव्याने सत्तारुढ झालेले भाजप सरकारचे मंत्री सांगत असले तरी खर्चात मात्र कुठलीही काटकसर होताना दिसत नाही. आघाडी सरकारच्याच पावलावर पाऊल ठेवत विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्री,आमदार यांच्या निवास व्यवस्थेवर आणि इतरही कामांवर सरासरी सात कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च होण्याची शक्यता आहे.नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे किती प्रश्न सुटतात हा प्रश्न जसा वादग्रस्त ठरतो तसाच अधिवेशनाच्या निमित्ताने येणारे आमदार आणि मंत्री यांची निवास व्यवस्था आणि तत्सम कामांवर किती खर्च होतो हा सुद्धा मुद्दा दरवर्षी चर्चिला जातो. आतापर्यंत विरोधी बाकावर बसून भाजपने यावर अनेक वेळा टीकाही केली. आता हाच पक्ष सत्तेवर आला आहे. गत सरकारने तीन लाख कोटींचे कर्ज करून ठेवल्याचा आरोप राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केला असून राज्य काटकसरीनेच चालवावे लागेल, असे संकेतही त्यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाच्या निमित्ताने दरवर्षी होणाऱ्या खर्चात काही कपात केली जाते का याकडे लक्ष लागले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानभवन व रविभवन, आमदार निवास आदींच्या देखभाल दुरुस्तीवर तसेत सौंदर्यीकरणाच्या कामावर सरासरी सात कोटीच्या वर खर्च होणार असल्याची माहिती आहे. दरवर्षी यावर जवळपास एवढाच खर्च करण्यात येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे केली जातात. यंदाही अधिवेशनाच्या निमित्ताने या विभागाने कामाला सुरुवात केली आहे. भाजप सरकारचे नागपूरमध्ये होणारे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. नवा गडी नवा राज असेच त्याचे स्वरूप असेल. मंत्रीही नवीन असतील. त्यांच्या निवासाची व्यवस्था रविभवनात तर आमदारांची आमदार निवासात केली जाते. मुंबईहून येणाऱ्या पत्रकारांचा मुक्काम सुयोगमध्ये असतो. विधानभवन, रविभवन व सुयोगच्या देखभाल दुरुस्तीवर ४ कोटी ८५ लाख रुपये तर आमदार निवास आणि इतर व्यवस्थेवर अडीच कोटी रुपये खर्च होणार आहे. विधानभवनाची रंगरगोटी, रस्ते दुरुस्ती आणि सौेंदर्यीकरणावरही दरवर्षी खर्च केला जातो. हा अवास्तव खर्च आहे, अशी टीका करणाऱ्यांचे सध्या सरकार असले तरी यंदा त्यात काहीही बदल झालेला नाही. (प्रतिनिधी)