शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रशिक्षकांची निवृत्ती साठीनंतर

By admin | Updated: June 30, 2016 04:38 IST

राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत अध्यापकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे करण्याचा आघाडी सरकारने घेतलेला निर्णय बदलण्यात आला

मुंबई : राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत अध्यापकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे करण्याचा आघाडी सरकारने घेतलेला निर्णय बदलण्यात आला असून सेवानिवृत्तीचे वय आता पुन्हा ६० वर्षे करण्यात आले आहे. तसेच प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सरसकट ६५ वर्षे करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे आणण्यासाठी खुद्द उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाच विभागातील अधिकाऱ्यांशी झगडावे लागल्याचे वृत्त आहे.सेवानिवृत्तीचा हा प्रस्ताव मागील आठवड्यात होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीपुढे यावा अशी आग्रही मागणी मंत्री तावडे यांनी धरली होती. विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे रजेवर असल्यामुळे तात्पुरता पदभार सचिव महेश पाठक यांच्याकडे होता. याआधी वयोमर्यादा वाढीचा निर्णय घेताना आपणच तो प्रस्ताव तयार केला होता, त्यावर आपली सही होती. त्यामुळे आता तो निर्णय बदलताना आपणच पुन्हा कशी सही करायची, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र सरकार म्हणजे अधिकारी नव्हेत. अधिकाऱ्यांना कधीपासून अशा भूमिका घेता येऊ लागल्या, असा सवाल करीत तावडे यांनी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांच्याकडे तक्रारही केली होती. आजच प्रस्ताव आणा नाहीतर आपल्याला सचिव बदलून द्या, असेही तावडे यांनी सांगितल्याचे समजते. एवढे सगळे रामायण घडूनही हा प्रस्ताव मागच्या बैठकीत आलाच नाही. दोन दिवसापूर्वी कुंटे रजेवरुन हजर झाले आणि प्रस्तावाची फाईल पुढे सरकत आज मंत्रिमंडळ बैठकीत पोहोचली. (विशेष प्रतिनिधी)>निर्णय कोणाला लागू?राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील शासकीय संस्था तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्नित शासकीय तंत्र महाविद्यालये, पदविका संस्था आणि महाविद्यालयांमधील अध्यापक, त्याचप्रमाणे अकृषी विद्यापीठे, तंत्रशास्त्र विद्यापीठे व संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक, ग्रंथपाल, उपग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल तसेच संचालक, उपसंचालक व सहायक संचालक, शारीरिक शिक्षण या सगळ्यांना हा निर्णय लागू असेल.उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सरसकट ६५ वर्षे असेल. वयाच्या ६२ वर्षानंतर प्राचार्यांना मुदतवाढ देण्यापूर्वी त्यांच्या कामकाजाचा विहित समितीकडून आढावा होणार. समितीच्या शिफारशीनुसार त्यांना कमाल ६५ वर्षापर्यंत मुदतवाढ दिली जाईल. त्यापुढे मुदतवाढ नसेल.