शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘राजीनामास्त्रा’नंतर कामतांची मनधरणी

By admin | Updated: May 4, 2017 05:04 IST

ज्येष्ठ नेते-माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न आता थेट दिल्लीहून

मनोहर कुंभेजकर / मुंबईज्येष्ठ नेते-माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न आता थेट दिल्लीहून सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुजरातचे प्रभारी म्हणून कामत यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारलेला असला तरी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाचा आणि राजस्थानचे प्रभारी म्हणून त्यांनी दिलेला राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अजून तरी स्वीकारलेला नाही. सध्या भाजपा आणि शिवसेनेत सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामत यांनी पुन्हा पक्षकार्यात जोमाने सहभागी व्हावे, यासाठी दिल्लीहून प्रयत्न सुरु झाले आहे. कामत यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत काँग्रेसचे भवितव्य काय असेल? यावर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आता खाजगीत चर्चा रंगू लागल्या आहेत. विद्यार्थीदशेपासून काँंग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या कामत यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्षात आहेत. दर शनिवार आणि रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० पर्यंत त्यांना अंधेरी (प) डी. एन. नगर येथील वर्सोवा पोलीस ठाण्यालगत असलेल्या त्यांच्या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत असे. विशेष म्हणजे अजूनही ही गर्दी कमी झालेली नाही. तथापि, त्यांच्या राजीनाम्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आणि कार्यकर्ते सध्या कमालीचे अस्वस्थ आहेत.मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीबद्दल कामत कमालीचे नाराज होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपात त्यांच्या कार्यकर्त्यांना डावलले गेले होते. याबाबत त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेवून ही बाब त्यांना सांगितली होती. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. गुरुदास कामत हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असतांना त्यांच्या नेतृबाखाली मुंबई महानगर पालिकेत काँग्रेसने ८९ जागा जिंकल्या होत्या, हे विसरता येणार नसल्याचे मुंबईतील एका वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्याने सांगितले. कामत यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला काँग्रेसच्या मुंबईच्या प्रक्रियेत डावल्यामुळे मुंबईचे पडसाद राज्यात उमटले. अलीकडेच राज्यात झालेल्या विविध ठिकाणच्या महानगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसला म्हणावे तसे यश मिळाले नाही. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे मातब्बर नेते आहेत, त्यांच्या नेमणूका कामत यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना केल्या होत्या, अशी माहितीही काँग्रेसच्या एका नेत्याने दिली. राहुल गांधी आतातरी लक्ष देणार का?

२०१२ च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे ५१ नगरसेवक निवडून आले होते,आणि २०१७च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे केवळ ३१ नगरसेवक विजयी झाले, हे विशेष. काँग्रेसमधील राजीनाम्यानंतर कामत भाजपात जाणार अशा जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु त्यांनी मात्र या वृत्ताचे खंडन करत आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सुतोवाच केले होते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना कामत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत काँग्रेसचे सर्व ६ खासदार निवडून आले होते. सध्याच्या मुंबई काँग्रेसच्या दिशाहीन अवस्थेला आणि ढासळत्या आलेखाकडे राहुल गांधी आता तरी लक्ष घालणार का? कामत यांच्यासारख्या निष्ठावान आणि अनुभवी नेत्याशी चर्चा करून डावललेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणून मुंबई काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार का? असे प्रश्न मुंबई काँग्रेसमधील कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.