मुंबई : एकमेकांचे शाब्दिक ओरबाडे काढून झाल्यावर अखेर युतीच्या चर्चेला राजी झालेल्या शिवसेना, भाजपाची बोलणी आणखी दोन दिवस लांबणीवर पडली आहे. मकर संक्रांतीमुळे युतीच्या चर्चेची बोलणी आता १५ जानेवारीनंतरच होणार असल्याचे समजते. त्यामुळे युतीवर संक्रांत येणार की दोन्ही तिळगुळ घ्या, गोड गोड बोलाचे धोरण स्वीकारणार हे चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाल्यावरच समजणार आहे. दरम्यान, शिवसेनेसोबत पारदर्शक युती होईल अशी भाषा भाजपा नेत्यांकडून केली जात आहे. याबाबत बोलताना शिवसेना खासदार अनिल देसाई म्हणाले की, युतीच्या चर्चेसाठी भाजपाकडून अधिकृतरित्या विचारणा झाली आहे. लवकरारत लवकर यतीच्या चर्चेला सुरुवात होईल. गेली वीस वर्षे आम्ही सोबत आहोत. त्यामुळे पारदर्शक कारभाराचा वेगळा अर्थ माहित नाही, असा टोलाही देसाई यांनी लगावला. (प्रतिनिधी)
युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ संक्रांतीनंतर
By admin | Updated: January 14, 2017 05:20 IST