शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारानंतर खून करणाऱ्याला फाशीच

By admin | Updated: January 22, 2016 03:34 IST

जालना शहरातील दोन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला जालन्याच्या सत्र न्यायालयाने खुनाच्या आरोपाखाली ठोठावलेली फाशीची शिक्षा

औरंगाबाद : जालना शहरातील दोन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला जालन्याच्या सत्र न्यायालयाने खुनाच्या आरोपाखाली ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी कायम ठेवली.रवी अशोक घुमारे (२९) असे आरोपीचे नाव असून त्याने जालना येथे ६ मार्च २०१२ रोजी दोन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून केला. पोलिसांनी त्याच्यावर बालिकेचे अपहरण करणे, शारीरिक अत्याचार करणे, अनैसर्गिक शारीरिक अत्याचार करणे आणि खून करणे आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविला. जालन्याचे सत्र न्यायाधीश आशुतोष एन. करमरकर यांनी १८ सप्टेंबर २०१५ रोजी रवीला शारीरिक अत्याचाराच्या आरोपाखाली जन्मठेप आणि खुनाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली. फाशीची शिक्षा कायम होण्यासाठी (कन्फर्मेशन) प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे पाठविले होते. तसेच आरोपीतर्फे शिक्षेस आव्हान देणारे अपीलही खंडपीठात दाखल करण्यात आले होते. औरंगाबाद खंडपीठात ‘कन्फर्मेशन केस’ आणि आरोपीचे अपील यावर एकत्रित सुनावणी झाली. सुनावणीअंती रवीने केलेले कृत्य हे ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (रेअरेस्ट आॅफ रेअर) असल्याचेसांगत न्या. ए.व्ही. निरगुडे आणि न्या. आय. के. जैन यांनी यांच्या खंडपीठाने रवीची फाशीची शिक्षा कायम केली. (प्रतिनिधी)