शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईनंतरही ‘जैसे थे’

By admin | Updated: June 29, 2016 01:48 IST

स्कूल बसच्या चालक, मालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे ‘लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकमधून उघडकीस आले.

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बसच्या चालक, मालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे ‘लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकमधून उघडकीस आले. नियम मोडणाऱ्या स्कूल बसविरोधातील कारवाईच्या जाळ््यात गेल्या १० महिन्यांत २६२ स्कूल बस अडकल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. मात्र, कारवाई केल्यानंतरही परिस्थिती जैसे थेच असल्याचे दिसून आले. मुंबईत परवानाप्राप्त शाळेच्या मालकीच्या स्कूल बस आणि करारावरील परवाना प्राप्त स्कूल बसची एकूण संख्या जवळपास ३ हजार ९५ आहे. या बसमधून मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिवहन विभागाने नियमावली आखून दिली आहे. त्याला मात्र मुंबईत फाटा देण्यात येत आहे. प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती असणारे रजिस्टर बसमध्ये नसणे, बसच्या मागील आणि पुढील बाजूस स्कूल बस असा उल्लेख नसणे, बसमध्ये महिला मदतनीस नसणे, चालकाच्या खिशावर ओळखपत्र नसणे असे प्रकार वारंवार घडतात. या विरोधात कारवाई करत असल्याचा दावा परिवहन आयुक्त कार्यालयाकडून केला जात आहे. एप्रिल २0१५ ते जानेवारी २0१६ दरम्यान आरटीओने नियमांचे उल्लंघन केलेल्या स्कूल बसविरोधात कारवाई केली. यात २६१ बसवर कारवाई करण्यात आली असून, ११२ बस अडकवून ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईतून ४ लाख ८४ हजार ९८ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यातील एकूणच स्कूल बसवर केलेल्या कारवाईची माहिती घेतल्यास ९ हजार ३४२ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, २ हजार ८४ वाहने ही दोषी असल्याचे आढळले आहे. २0१४-१५ मध्ये हाच आकडा २0१४ एवढा होता, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)