शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाज बैठकीनंतर एकास चोपले

By admin | Updated: September 7, 2016 23:51 IST

मराठा समाजातर्फे काढले जाणारे मोर्चे हे अ‍ॅट्रॉसिटीच्या विरोधात काढले जावेत, त्यासाठी निधीची अडचण येणार नाही

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 7 - मराठा समाजातर्फे काढले जाणारे मोर्चे हे अ‍ॅट्रॉसिटीच्या विरोधात काढले जावेत, त्यासाठी निधीची अडचण येणार नाही, अशी भूमिका बैठकीत मांडणाऱ्याचा संशय आल्याने बुधवारी कार्यकर्त्यांनी त्याची झडती घेऊन त्यानंतर त्याला चांगलाच चोप दिला. शेकाप कार्यालयात झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत हा प्रकार घडला. संदीप गिड्डे (वय ४५, रा. कऱ्हाड) असे त्याचे नाव आहे. त्याचा लॅपटॉप ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यामध्ये संशयास्पद माहिती हाती आल्याचे सांगण्यात आले. घडले ते असे : गेल्या काही दिवसांत कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राज्यात नाशिक, जळगाव, बीड येथे विशाल मोर्चे निघाले होते. या मोर्चाच्या बैठकीस गिड्डे उपस्थित होता. दोन दिवसांपूर्वी तो कोल्हापुरात येऊन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांना भेटला. कोल्हापुरातही मराठा समाजाचा मोर्चा काढा व त्यामध्ये अ‍ॅट्रॉसिटीच्या विरोधात उघडपणे भूमिका घ्या, असा त्याचा आग्रह होता. मोर्चासाठी निधीपासून कशाचीही मदत लागल्यास त्यास अडचण नाही, असे तो सांगत होता. मराठा-दलित समाजात तेढ वाढेल, अशी वक्तव्ये तो करीत होता. त्यामुळे त्याच्या हेतूबद्दल शंका आली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अन्य शहरांतील मराठा संघटनांच्या प्रतिनिधींकडे चौकशी केली असता अशी व्यक्ती त्या शहरांतील मोर्चाच्या नियोजनाच्या बैठकीस उपस्थित होती व अ‍ॅट्रॉसिटीविरोधात बोलत होती, असे निदर्शनास आले. तो मंगळवारी (दि. ६) मुंबईत नीतेश राणे, मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकास, तसेच मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे यांनाही भेटल्याचे स्पष्ट झाले.बुधवारी येथील शेकापच्या कार्यालयात झालेल्या बैठकीतही त्याने अशीच वादग्रस्त भूमिका मांडली व त्यासाठी आग्रह धरला. त्यावेळी कार्यकर्त्यांना जास्तच शंका आली. बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या डायरीमध्ये माधव भंडारी यांचा मोबाईल नंबर व अन्य काही सांकेतिक भाषेतील माहिती आढळून आली. त्याच्या बोलण्यातही असंबद्धपणा होता. आपण इन्व्हेंट मॅनेजमेंटचे काम करीत असल्याचे तो सांगत होता. त्याचा संशय आल्याने त्याला चोप देण्यात आला व साहित्य काढून घेऊन त्याला सोडून देण्यात आले.