शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

मुंबईतील मराठा मोर्चानंतर मनसे ठरवणार भूमिका

By admin | Updated: September 26, 2016 03:07 IST

कोपर्डी येथील बलात्काराच्या प्रकरणानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीच अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केली होती.

मुंबई : कोपर्डी येथील बलात्काराच्या प्रकरणानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीच अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केली होती. राज ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर अन्य नेते त्यावर बोलू लागले. सध्या राज्यात विविध ठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघत असून, मुंबईतही मोर्चा होणार आहे. या मोर्चानंतरच मनसे आपली भूमिका जाहीर करेल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी रविवारी सांगितले. आगामी महापालिका निवडणुका, मराठा आंदोलन आणि पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे पक्षाचे नेते, पदाधिकारी, सरचिटणीस, विभागप्रमुखांची बैठक झाली. स्वत: पक्षप्रमुख राज ठाकरे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्यूहरचना निश्चित करण्यात आली. सुमारे तासभर ही बैठक चालली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्षसंघटनेवर भर देण्यात येणार आहे. राज ठाकरे मुंबईतील प्रत्येक शाखेला भेट देणार असून, गटप्रमुखांशी संवाद साधणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी बैठकीनंतर सांगितले, तर मराठा आंदोलनाच्या संदर्भात मुंबईतील मोर्चानंतर राज ठाकरे याबाबत पक्षाची भूमिका मांडणार आहेत. अ‍ॅट्रॉसिटीबाबत सर्वप्रथम राज ठाकरे यांनीच जाहीर भूमिका मांडल्याचे नांदगावकरांनी स्पष्ट केले. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात घेतलेली भूमिका कायम असणार आहे. काही चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी मनसेने ही भूमिका घेतल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी फेटाळून लावला. मनसेच्या विरोधानंतर अनेक जणांनी पाकिस्तानी कलाकारांचे काम बंद केले आहे. काही कलाकारांचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. ज्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला, त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया खोपकर यांनी दिली. १उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलावंतांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, मनोरंजन क्षेत्रात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पाकिस्तानी कलावंतांचा सहभाग असलेली मालिका बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या ‘झी’ पाठोपाठ, आता ‘कलर्स’ वाहिनी आणि ‘रेडिओ मिर्ची’नेही पाक कलावंतांच्या भूमिका असणाऱ्या मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पाक कलावंतांचे भारतातील ‘बुरे दिन’ सुरू झाले आहेत.२‘झी जिंदगी’वाहिनीने पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी सांगितले की, पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नये, म्हणून आम्ही अनेक मालिका निर्मात्या कंपन्यांना निवेदने पाठविली आहेत. यापैकी बहुतेकांना आमची भूमिका योग्य वाटत असल्याने काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ३२५ सप्टेंबर(रविवार) रोजी पाकिस्तानी गायक आतिफ असलम यांची मुलाखत रेडिओ मिर्चीवर होणार होती. मात्र, रेडिओ मिर्चीने ही मुलाखत रद्द केली. दुसरीकडे कलर्स वाहिनीवरील कॉमेडी नाइट्स बचाओ भाग-१ मध्ये काही पाकिस्तानी कलाकार सहभागी झाले होते.मात्र, आता भाग-२ मध्ये पाकिस्तानी कलावंत दिसणार नाहीत, असे मालिकेचे दिग्दर्शक विपुल शाह यांनी लेखी कळवले आहे, असे चित्रपट सेनेचे सरचिटणीस शशांक नागवेकर यांनी सांगितले.