शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टीचा मोका साधून ‘तो’ येणार

By admin | Updated: July 10, 2016 00:43 IST

रविवारच्या बेत आखताना पावसाचा रागरंग पाहून घ्या. राज्यात जोर धरलेला पाऊस सुट्टीचा मोका साधून धो-धो पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र

पुणे : रविवारच्या बेत आखताना पावसाचा रागरंग पाहून घ्या. राज्यात जोर धरलेला पाऊस सुट्टीचा मोका साधून धो-धो पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. शनिवारी दिवसभरात विदर्भापाठोपाठ कोकण, मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस झाला. गेल्या २ दिवसांपासून कोरडा असलेल्या मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने धरणांमधील साठ्यात वाढ झाली आहे. सांगली, सातारा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी पावसाचाजोर होता. मुंबईत अधूनमधून सरींवर-सरी येत होत्या. शहरात ३.८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे १४.६०, ८.५१ मिलीमीटर पाऊस झाला. पुण्यातही सरी बरसल्या. मराठवाड्यात जालना, नांदेड जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. जून अखेरपर्यंत अवघ्या ५० टक्क्यांवर असलेल्या पेरण्या गेल्या ८ दिवसांत १३ टक्क्यांनी वाढून ६३ टक्क्यांवर पोहोचल्या आहेत. उर्वरित पेरण्या चार दिवसांत पूर्ण होतील, अशी शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. (प्रतिनिधी)पाऊस सरासरी गाठेनाजून महिना कोरडा गेल्याने राज्यात पावसाने अजूनही सरासरी गाठलेली नाही. आजपर्यंत एकूण ९० टक्केच पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला असून, तो सरासरीच्या केवळ ४४ टक्केच पडला आहे. नंदूरबार ५४ , कोल्हापूर ६०, धुळे ७१, जळगाव ७२, सोलापूर, उस्मानाबाद व औरंगाबाद ७५, यवतमाळ ७७ टक्के, भंडारा जिल्ह्यात ७८ टक्के पाऊस पडला आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक १३८ टक्के पाऊस झाला. त्यापाठोपाठ रत्नागिरी १२० टक्के आणि पालघर जिल्ह्यात ११७ टक्के पाऊस झाला. तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.