शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

पतीच्या निधनानंतर ‘तिला’ अंधारकोठडीत डांबले

By admin | Updated: July 20, 2016 05:51 IST

मुलाच्या अपघाती निधनानंतर सुनेला मानसिक आधार देण्याऐवजी तिला वर्षभर अंधार कोठडीत डांबले.

वैभव बाबरेकर,

अमरावती- मुलाच्या अपघाती निधनानंतर सुनेला मानसिक आधार देण्याऐवजी तिला वर्षभर अंधार कोठडीत डांबले. धडधाकट शरीरयष्टीची ती मरणासन्न अवस्थेत पोहोचली. समाजमन सुन्न करणारा हा गंभीर प्रकार तिवसा तालुक्यातील कुऱ्हा या गावी उघडकीस आला. जयश्री सुरेश दुधे (३५) असे या अत्याचारग्रस्त महिलेचे नाव आहे.भाऊराव कुऱ्हाडे यांची कन्या जयश्री हिचा विवाह २००१ मध्ये नांदेड जिल्ह्यातील माहुर येथील सुरेश दुधे यांच्याशी झाला. त्यांना दोन मुलगे व एक मुलगी झाली. सुखी संसारावर तीन वर्षांपूर्वी आघात झाला. जयश्रीचे पती सुरेश यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर सासरच्या मंडळीनी तिचा छळ सुरू केला. सुरेश यांच्या नावाने माहूर येथे १३ एकर शेतजमीन आहे. त्या शेतीच्या हव्यासापोटी हा छळ होता. वडलांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी जयश्रीला माहेरी आणले. परंतु सासरच्या लोकांनी माहेरी जाऊन गोडीगुलाबीने तिला पुन्हा सासरी नेले आणि तिचा छळ सुरू केला. व्जयश्रीला वर्षभर अंधार कोठडीत डांबून ठेवले. अपुरे जेवण दिले. मारहाण केली. यामुळे आता तिचा केवळ हाडाचा सापळाच शिल्लक राहिला. त्यानंतर १४ जुलै रोजी मरणासन्न स्थितीत तिला कुऱ्हा येथील माहेरी आणून सोडले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. >तीन चिमुकल्यांचीकाळजी घेणार कोण?जयश्रीला संकेत (९), ऐश्वर्या (७), प्रणव (५) अशी तीन मुले आहेत. त्यांचे संगोपन सासरची मंडळी करीत असली तरी जयश्रीच्या पित्याला नातवंडांची चिंता आहे. वडिलांची छत्रछाया गमावलेल्या, आई मरणाच्या दारात असलेल्या त्या चिमुकल्यांकडे लक्ष द्यायला कुणीच नाही. माझ्या मुलीचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. तिला अन्न पाण्याविना अंधाऱ्या खोलीत वर्षभरापासून डांबून ठेवण्यात आले. त्यामुळे ती कमालीची अशक्त झाली आहे. कुऱ्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलीे. मात्र, पोलिसांनी दखल घेतली नाही. - भाऊराव कुऱ्हाडे, जयश्रीचे वडील