शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीच्या मशागतीनंतर खरीपाच्या पीक नुकसानाचे पंचनामे

By admin | Updated: November 4, 2016 02:08 IST

पीक नुकसानाचे पंचनामे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार ठरत आहे.

संतोष येलकरअकोला, दि. ३- परतीच्या पावसामुळे जिल्हय़ातील पीक नुकसानाचे सर्वेक्षण प्रशासनामार्फत करण्यात येत आहे; मात्र रब्बी पेरण्यांसाठी शेतकर्‍यांनी शेतीच्या मशागतीची कामे केल्यानंतर पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आल्याने, नुकसानाचे पंचनामे कसे करणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार विलंबाने सुरू करण्यात आलेले पीक नुकसानाचे पंचनामे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार ठरत आहे.जिल्हय़ात गत ४ ऑक्टोबरपर्यंंत परतीचा पाऊस जोरदार बरसला. या पावसामुळे काढणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच उडीद व कापूस पिकाचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविल्याने, गत दोन वर्षांंच्या दुष्काळी परिस्थितीनंतर जिल्हय़ातील शेतकरी पुन्हा हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर यावर्षीच्या खरीप हंगामात गत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत अतवृष्टी, वादळी वारे व पुरामुळे शेती पिके व फळ पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाच्या कृषी संचालक (विस्तार शिक्षण)मार्फत १९ ऑक्टोबर रोजीच्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुषंगाने गत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्हय़ातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांच्या नुकसानासह खरबडून गेलेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करून संयुक्त स्वाक्षरीचे अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हय़ातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना (बीडीओ) दिला. त्यानुसार गत पाच दिवसांपासून जिल्हय़ातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या संयुक्त पथकांमार्फत सुरू करण्यात आले; मात्र यावर्षीच्या रब्बी हंगामातील पेरण्या गत १५ दिवसांपासून सुरू झाल्या. रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतकर्‍यांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यात आली. शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर आणि रब्बी पिकांच्या पेरण्या सुरू झाल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या पीक नुकसानाच्या सर्वेक्षणात नुकसान झालेल्या शेतातील पीक नुकसानाची माहिती सर्वेक्षण करणार्‍या पथकांकडून कशी नोंदविली जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पीक नुकसानाच्या सर्वेक्षणाचा आदेश शासनामार्फत विलंबाने प्राप्त झाल्याने, सुरू करण्यात आलेले पीक नुकसानाचे पंचनामे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार ठरणार आहे.पिकांचे नुकसान दिसणार कसे?रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच रब्बीच्या पेरण्याही सुरू झाल्या. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या पीक नुकसानाच्या पंचनाम्यात सोयाबीन, मूग व उडीद पिकांचे नुकसान दिसणार कसे आणि यासंबंधीची माहिती सर्वेक्षण करणार्‍या पथकांकडून कशी नोंदविण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.