शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षे मानधन मगच कायम, राज्य शासनाचा फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:40 IST

आधी पाच वर्षे मानधनावर नोकरी करा, त्यानंतर तुमची पात्रता व कामगिरी तपासून तुम्हाला नियमित वेतनश्रेणी लागू केली जाईल, असा राज्य शासनातील नवीन ३६ हजार पदे भरतानाचा फॉर्म्युला असेल.

मुंबई : आधी पाच वर्षे मानधनावर नोकरी करा, त्यानंतर तुमची पात्रता व कामगिरी तपासून तुम्हाला नियमित वेतनश्रेणी लागू केली जाईल, असा राज्य शासनातील नवीन ३६ हजार पदे भरतानाचा फॉर्म्युला असेल. या फॉर्म्युल्याला अधिकारी, कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेत राज्य शासकीय सेवेत पहिल्या वर्षी ३६ हजार तर दुसऱ्या वर्षी ३६ हजार अशी ७२ हजार पदे भरण्यात येतील, असे जाहीर केले होते. त्यानुसार वित्त विभागाने गुरुवारी काढलेल्या शासन निर्णयात ही पदे मानधन तत्त्वावर पाच वर्षांसाठी भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.कृषी आणि ग्रामविकास हे दोन विभाग सक्षम करून त्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विकास, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, गृह, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, मृद व जलसंधारण आणि वित्त विभागातील पदे भरण्यात येतील. पाच वर्षांपर्यंत अधिकारी, कर्मचाºयांना मानधनावर घेतल्याने सरकारवर कमी आर्थिक बोजा पडणार आहे. सातवा वेतन आयोग नवीन कर्मचाºयांना किमान पाच वर्षे तरी लागू करण्याची त्यामुळे आवश्यकता नसेल. त्यामुळे त्याही आर्थिक जबाबदारीतून सरकारची सुटका होणार आहे.राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी पाच वर्षे मानधनावर कर्मचारी भरती करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. नवीन कर्मचाºयांना पहिल्या दिवसापासूनच वेतनश्रेणी लागू केली पाहिजे, ही महासंघाची मागणी असल्याचे ते म्हणाले.>शिक्षण सेवकांच्या धर्तीवर होणार भरतीशिक्षण सेवक, कृषी सेवक, ग्राम सेवकांची भरती ही आघाडी सरकारच्या काळापासूनच सुरुवातीला मानधन तत्त्वावर आणि नंतर कायमस्वरुपी नोकरी अशी केली जाते. मात्र, आता या सरकारने पद भरतीसाठी पाच वर्षांच्या मानधनाचा फॉर्म्युला पहिल्यांदाच आणला आहे.पहिल्या वर्षी ३६ हजार तर दुसºया वर्षी ३६ हजार अशी ७२ हजार पदे भरण्यात येतील. एरवी किरकोळ महत्त्वाचे शासकीय निर्णयही शासनाच्या वेबसाइटवर टाकले जातात पण पद भरतीबाबतचा जीआर वित्त विभागाने वेबसाईटवर टाकण्याचे टाळले.