शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

अखेर पराभवानंतरच पायात घातली चप्पल

By admin | Updated: February 24, 2017 02:19 IST

पुरंदर तालुक्यातील बेलसर माळशिरस गटातील नाझरे क. प. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते संदीप चिकणे

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील बेलसर माळशिरस गटातील नाझरे क. प. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते संदीप चिकणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचेच जिल्हा परिषदेचे उमेदवार सुदाम इंगळे यांचा पराभव करण्याची गावचे ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात पायातील चपला उतरवून ‘इंगळेंचा पराभव करेन तेव्हाच पायात चपला घालीन,’ अशी शपथ घेतली होती. आज इंगळेचा दोन हजारांवर मतांनी पराभव झाला. सायंकाळी संदीप चिकणे यांनी नागेश्वरच्या मंदिरात जाऊन तेथील खारतोडेमहाराजांच्या उपस्थितीत पायात चपला घातल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने ६ फेब्रुवारी रोजी बेलसर माळशिरस गटासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते व हा गट गेली २० वर्षे ज्यांच्या ताब्यात होता त्या सुदाम इंगळे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आणि या कार्यकर्त्याने ही शपथ घेतली. इंगळे यांचा पराभव करण्यासाठी घर सोडले. गटातील सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, युवा कार्यकर्त्यांना एकत्र करून इंगळे यांच्याविरोधात प्रचारात जुंपले. दिवसभर प्रचार करून घरी न येता नातेवाईकांकडेच मुक्काम करीत तब्बल १७ दिवस अनवाणी प्रचार केला. त्यांच्या या अशा शपथेची व प्रचाराची राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते खिल्ली उडवत होते. चेष्टा करीत होते. इंगळे यांचे कार्यकर्ते तर सतत डिवचत होते. यात त्यांना यश आले. आज सायंकाळी ५ वाजता ते गावात आले. गावातील युवकांनी त्यांची मिरवणूक काढली. थेट नागेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी खारतोडेमहाराजांच्या हस्ते चपलांचा जोड स्वीकारला व पायात घातल्या. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत याच गावाने सुदाम इंगळे यांच्या कन्या सारिकाताई इंगळे यांचा प्रचार केला होता. गावानेही त्यांना त्या वेळी सुमारे ५०० चे मताधिक्य दिले होते. मात्र या वेळी इंगळे यांच्यावर कॉँग्रेसच्या उमेदवाराला १०० चे मताधिक्य या गावाने दिले आहे. पक्षाचा एक कार्यकर्ता असूनही सुदाम इंगळे यांनी मला व माझ्या कुटुंबाला गेली पाच वर्षे प्रचंड मनस्ताप व त्रास दिला. खोट्यानाट्या केसेसमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केल्यानेच आपण हा निर्णय घेतल्याचे संदीप चिकणे यांनी सांगितले. मात्र तो अत्यंत धक्कादायकच ठरला आहे. (वार्ताहर)