शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादीत फारकत

By admin | Updated: March 3, 2017 03:24 IST

काँग्रेसने निवडणुकीनंतर पुन्हा लोकशाही आघाडीत न राहता आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे : निवडणुकीत घासाघीस करून एकदाची आघाडी करणाऱ्या काँग्रेसने निवडणुकीनंतर पुन्हा लोकशाही आघाडीत न राहता आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही अवघ्या तीन नगरसेवकांच्या जोरावर उपमहापौरपदाचा उमेदवारी अर्जही काँग्रेसने दाखल केल्याने राष्ट्रवादी येत्या काही दिवसांत काँग्रेस कोणाच्या बाजूने झुकणार, याचा अंदाज घेणार आहे.निवडणुकीत लोकशाही आघाडीला ३८ जागांवर यश मिळाले आहे. त्यानुसार, ही आघाडी निवडणुकीनंतरही कायम राहावी, यासाठी बुधवारी राष्ट्रवादीने कोकण विभागीय आयुक्तांकडे एकत्रित गटाची नोंदणी करण्यासाठी बोलावणे धाडले होते. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनीही पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना एकत्रित जाण्याचा सल्ला दिला होता. असे असतानाही काँग्रेसने पुन्हा घूमजाव केले आहे. आता राष्ट्रवादीने महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून काँग्रेसकडून उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल झाला आहे. यापूर्वीचा म्हणजेच २०१२ चा इतिहास तपासला असता काँग्रेसने सेनेला उघड अथवा छुपा पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता काँग्रेस त्याच पद्धतीने सेनेला पाठिंबा देणार का, याची चाचपणी राष्ट्रवादी यानिमित्ताने करणार आहे. त्यानंतर, राष्ट्रवादी आपली पुढील दिशा ठरवणार आहे. (प्रतिनिधी)