शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहातील सुरक्षेवर विचार करणे आवश्यक’

By admin | Updated: July 1, 2017 03:01 IST

मंजुळा शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत विचार करणे आवश्यक आहे, असे उच्च न्यायालयाने येरवडा कारागृहातील

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मंजुळा शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत विचार करणे आवश्यक आहे, असे उच्च न्यायालयाने येरवडा कारागृहातील स्थितीबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले.बाळू चौधरी उर्फ शिवाजी तुकाराम चौधरी (४१) याला पोलिसांनी एका गुन्ह्याप्रकरणी २०१४ मध्ये अटक केली, तेव्हापासून त्याला येरवडा कारागृहातच ठेवण्यात आले आहे. या कारागृहाच्या अमानवी स्थितीबाबत चौधरी याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. अतिसुरक्षा असलेल्या अस्वच्छ आणि घाणेरड्या सेलमध्ये ठेवून कारागृह प्रशासन आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत आहेत, तसेच कारागृहाच्या नियमानुसार आपल्याला ज्या सुविधा मिळायला हव्यात, त्याही देण्यात येत नसल्याचा आरोप चौधरी याने याचिकेद्वारे केला आहे. शुक्रवारच्या सुनावणीत सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी कारागृहांच्या काराभाराबद्दल आणखी एक याचिका दाखल केली असून, त्यावरील सुनावणी अन्य खंडपीठापुढे सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्या याचिकेत आणि या याचिकेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांमध्ये साधर्म्य असल्याने, ही याचिकाही त्याच खंडपीठापुढे वर्ग करावी, अशी विनंती शिंदे यांनी न्यायालयाला केली.त्यावर न्यायालयाने त्याही याचिकेत (अन्य खंडपीठापुढे असलेली याचिका) कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे का? अशी विचारणा सरकारकडे केली.‘शेट्ट्येच्या मृत्यूनंतर कारागृहातील सुरक्षेबाबत विचार करणे आवश्यक आहे. आरोपी / कैद्यांचीही सुरक्षा महत्त्वाची आहे,’ असे म्हणत, न्यायालयाने सरकारी वकिलांना याबाबत एका आठवड्यात सूचना घेण्याचे निर्देश दिले.