शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईपाठोपाठ नागपुरातही काँग्रेस-राष्ट्रवादीचा काडीमोड

By admin | Updated: January 31, 2017 22:28 IST

राष्ट्रवादीने आघाडी करण्याबाबत दिलेल्या प्रस्तावाला काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर आघाडी तुटली आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 31 - राष्ट्रवादीने आघाडी करण्याबाबत दिलेल्या प्रस्तावाला काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर आघाडी तुटली आहे. प्रस्ताव देणाऱ्या राष्ट्रवादीनेच आघाडी तुटल्याची घोषणा करण्यात पुढाकार घेतला आहे. नागपुरात भाजपासारख्या बलाढ्य पक्षाशी सामना असल्यामुळे तसेच चार सदस्यीय प्रभाग आघाडी तुटल्यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बुधवारी दिवसभर काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून आघाडीची बोलणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसचे सर्वच नेते मुंबईत संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी गेले आहेत. त्यामुळे फक्त मोबाईलवर चर्चेच्या फेऱ्या होत राहिल्या. शेवटी तोडगा निघत नसल्यामुळे बुधवारी रात्री ८.३० वाजता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख यांनी प्रसिद्धिपत्रक जारी करीत आघाडी तुटल्याची व राष्ट्रवादी आता स्वबळावरच लढेल, अशी घोषणा केली. देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, जातीयवादी शक्तीला थांबविण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचा आमचा प्रयत्न होता. यासाठी काँग्रेसकडे प्रस्ताव देण्यात आला होता. काँग्रेस नेत्यांसोबत बैठका घेऊन चर्चाही करण्यात आली. मात्र, राष्ट्रवादीसाठी पोषक वातावरण असलेल्या जागाही सोडण्यास काँग्रेस तयार नव्हती. काँग्रेसने अखेरपर्यंत वेळकाढू धोरण सुरू ठेवले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ निघत आहे. काँग्रेस पाहू, थांबा असे सांगत आहे. यामुळे राष्ट्रवादी इतर समविचारी पक्षाला सोबत घेऊन स्वबळावर निवडणुकीला सामोरे जात आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. गेल्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची २९ जागांवर आघाडी झाली होती. याशिवाय दोन्ही पक्षांनी आघाडी धर्म न पाळता आपल्या उमेदवारांना ए-बी फॉर्म दिल्याने तीन जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाली होती. निकालानंतर राष्ट्रवादीने ६ तर काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या होत्या.