शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ महाराष्ट्र’नंतर ‘स्वस्थ महाराष्ट्र’

By admin | Updated: July 12, 2016 03:45 IST

स्वच्छ महाराष्ट्रनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार स्वस्थ महाराष्ट्र मिशन राबविण्यात येणार आहे. शासकीय यंत्र

यदु जोशी,  मुंबईस्वच्छ महाराष्ट्रनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार स्वस्थ महाराष्ट्र मिशन राबविण्यात येणार आहे. शासकीय यंत्रणा, सीएसआर फंड, खासगी रुग्णालये आणि नामवंत डॉक्टर यांच्या सहकार्याने ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात गेली अनेक वर्षे भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन यशस्वीरीत्या करणारे गिरीश महाजन हे वैद्यकीय शिक्षणमंत्री झाल्यानंतर आता या मिशनची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जळगाव, यवतमाळ आणि नागपूर या तीन जिल्ह्यांमध्ये अलीकडेच प्रायोगिक तत्त्वावर अशी शिबिरे घेण्यात आली. तिन्ही शिबिरांना मुख्यमंत्री स्वत: उपस्थित होते. त्यानंतरच ‘स्वस्थ महाराष्ट्र’ची संकल्पना पुढे आली आहे. नामवंत कंपन्या सीएसआर फंडातून राज्याचे आरोग्य सुधारण्यासाठी योगदान देण्यास इच्छुक असून त्यात टाटा, अंबानींसारख्या उद्योगपतींचादेखील समावेश आहे. वर्षभरात तीन हजार कोटी रुपये सीएसआर फंडातून उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. टाटा ट्रस्टने आरोग्य सुविधांसाठी भरीव अर्थसाहाय्य देण्यास आधीच सुरुवात केली आहे. स्वत: रतन टाटा त्यात जातीने रस घेत आहेत. आरोग्य शिबिरे ही सोपस्कारापुरती नसतील. त्यासाठी एक यंत्रणा उभारली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांनी त्यासाठी अमलात आणलेला पॅटर्न राबविला जाईल. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर तीन आशा वर्कर आणि तीन कार्यकर्त्यांची एक टीम असेल. प्रत्येक केंद्रात सात दिवसांचे आरोग्य शिबिर आयोजित केले जाईल आणि शस्त्रक्रिया वा पुढील उपचारांची गरज असलेल्या रुग्णांची यादी तयार केली जाईल. अशाच रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या आरोग्य शिबिरांसाठी पाठविले जाईल. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे त्यांच्यावर जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वा खासगी रुग्णालयांमध्ये त्या करण्यात येतील आणि तेथे ती सुविधा नसेल तर जवळच्या विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी वा मुंबईला रुग्णांना पाठविण्यात येणार आहे. सर्व उपचार मोफत करण्यात येणार आहेत. जिल्ह्याजिल्ह्यात झालेल्या शिबिरांतून किती रुग्णांना फायदा झाला याचा आढावा घेतानाच काही महिने वा वर्षांनंतर त्यांच्या स्वास्थ्याबाबत नेमकी अद्ययावत संगणकीकृत माहिती ठेवणारी यंत्रणाही उभारली जाणार आहे. जळगावमध्ये यंदाच्या शिबिरात ७५ हजार रुग्णांपैकी सर्वांवर उपचार करण्यात आले. ५ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.