शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लिंंगपरिवर्तनानंतर दाम्पत्याचा छळ सुरूच

By admin | Updated: August 2, 2016 03:15 IST

ख्रिस्ती आणि मुस्लीम समाजातील दोन मित्रांचे एकमेकांवर प्रेम जडले.

शशी करपे,

वसई- ख्रिस्ती आणि मुस्लीम समाजातील दोन मित्रांचे एकमेकांवर प्रेम जडले. प्रेमाखातर एकाने लिंग परिवर्तन करून घेतल्यानंतर दोघे विवाहबद्ध झाले. मात्र, दोघांच घरातून विरोध होत असल्याने दोघांनीही आपापल्या धर्माचा त्याग करून मुंबईतून थेट नालासोपाऱ्यात येऊन संसार थाटला. मात्र, याठिकाणीही स्थानिकांकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे दोन वेळा आत्महत्येचाही प्रयत्न झाला. गोरेगाव येथील एका कॉल सेंटरमध्ये जेम्स सेमसन फ्रान्सिस आणि रिझवान खान काम करीत असताना दोघांची घट्ट मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निणर्य घेतला. त्यासाठी जेम्सने लिंंगबदल करून स्त्रित्व स्विकारले. या दोघांच्या निर्णयाला दोघांच्या कुटुंबीयांकडून तीव्र विरोध सुुरु झाला. कुटुंब आणि समाजातून होणाऱ्या विरोधाला न जुमानता दोघांनीही लग्न केले. त्यासाठी दोघांनीही आपापल्या कुटुंबाचा आणि धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्विकारला. धर्मांतरानंतर लिंंगबदल केलेला जेम्स कालिका आर्या झाली. तर रिझवान खान रामश्री आर्या झाला. पण, लग्नानंतर सामाजिक आणि कौटुंबिक त्रास होत असल्याने कालिका आणि रामश्री यांनी नालासोपाऱ्यात येऊन आपला संसार थाटला. नालासोपाऱ्यात येऊन काही दिवस लोटल्यानंतर येथील एका टोळक्याने दोघांना त्रास द्याला सुरुवात केली आहे. घरातून बाहेर पडले की चौकातील एक टोळके तंच्यावर शेरेबाजी करीत असते. वारंवारच्या टिंंगलटवाळीला वैतागून कालिकाने दोन वेळा आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. दोघांनी न्यायासाठी आता पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी टोळक्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, टोळक्या पोलिसांच्या हाती लागत नाही. दुसरीकडे, टोळक्यांची शेरेबाजी अद्यापही सुरु असल्याने समाजातून सुरु असलेल्या छळाला दोघेही त्रस्त झाले आहेत. नैसर्गिक कारणामुळे लिंंग परिवर्तन करुन जेम्सनें कालिका बनण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मित्रासोबत लग्न केले. मात्र, समाजात अद्याप या विवाहाला मान्यता नसल्याने कालिका आणि रामश्रीचा मानसिक छळ सुरुच राहिला आहे.एकीकडे घरच्यांचा आधार नाही दुसरीकडे समाजाने वाळीत टाकण्याचा प्रकार होत असल्याने त्यांना नैराश्याने ग्रासले आहे. पोलिसांचा आधार घेतल्यावर तर समस्या आणखी वाढल्या आहेत.