शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

बंदीनंतरही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री जोरात

By admin | Updated: June 4, 2014 01:05 IST

शासनाने राज्यात तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा यावर बंदी घातल्यानंतरही गडचिरोली जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री जोरात सुरू आहे.

राज्यात ३३ कोटींचा गुटखा जप्त : सीमावर्ती भागातून पुरवठागडचिरोली : शासनाने राज्यात तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा यावर  बंदी घातल्यानंतरही गडचिरोली जिल्ह्यासह राज्याच्या विविध  भागात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री जोरात सुरू आहे. २00२ मध्ये राज्यातील आघाडी सरकारने गुटखाबंदीची घोषणा केली मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर २0१२  मध्ये गुटखाबंदीचा निर्णय सरकारने घेतला आणि राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घातली. मात्र गडचिरोली  जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातून मोठय़ा प्रमाणावर गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची  तस्करी करून येथे विक्री केली जात आहे. गुटखा बंदी नसताना हे पदार्थ विकण्यासाठी या ठिकाणी वितरक नेमण्यात आले होते.  त्यांच्याच माध्यमातून आताही छुप्या मार्गाने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, नांदेड  आदी जिल्ह्यांसह राज्याच्या अनेक भागात पाठविले जात आहे. सरकारने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणल्यानंतर या  पदार्थांची वाहतूक व विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. याची कठोर अंमलबजावणी करण्याचे अधिकार अन्न व औषध  प्रशासन विभागाला दिलेले आहे. पोलिसांनाही वाहतुकीदरम्यान वाहन पकडण्याचा अधिकार व कारवाईचे अधिकार आहेत. परंतु  राज्यात थातूरमातूर कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यातून पकडलेले तंबाखूजन्य पदार्थाचे ट्रक आर्थिक  व्यवहार करून सोडून दिल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. २0 जुलै २0१२ मध्ये राज्यात गुटखा बंदी झाली. त्यानंतर आतापर्यंत  ३३ कोटी रूपयाचा गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. गडचिरोली सहायक आयुक्त, अन्न व औषध  प्रशासन जिल्हा कार्यालयाच्यावतीने वर्षभरात दोन ठिकाणी धाडी टाकून एकूण १५६१ किलो प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त  केला असून त्याची किंमत ३ लाख १९ हजार ४५ रूपये आहे. गडचिरोली येथील अन्न व औषध प्रशासन जिल्हा कार्यालयाने १ एप्रिल २0१३ ते ३१ मार्च २0१४ या वर्षभराच्या कालावधीत  एकुण १६१ अन्न परवाने दिले. परवान्यापोटी एकूण १९ लाख ६४ हजार ५00 रूपयाचे नोंदणी शुल्क मिळाले. वर्षभरात या  कार्यालयाच्या वतीने एकूण ११९ अन्न नमुने विेषणासाठी घेण्यात आले. यापैकी कमी दर्जाचे पाच नमुने आढळले असून सध्या  आठ खटले दाखल आहेत. नागपूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात सात प्रकरणे निर्णयासाठी दाखल  करण्यात आली. यापैकी चार प्रकरणे निकाली काढण्यात आली असून एका प्रकरणात १५ हजार रूपयाचा दंड वसूल करण्यात  आल्याची माहिती आहे. या कार्यालयामार्फत वर्षभरात ८ हजार २५ तपासण्या करण्यात आल्या. ७९ जणांना सुधारणेबाबत नोटीस  बजावण्यात आली. १४ प्रकरणातून १९ हजारो रूपयाचे तडजोड शुल्क प्राप्त झाले. सिगारेट कायद्यांतर्गत १६ हजार ४00 रूपये  प्राप्त झाले. (जिल्हा प्रतिनिधी)