शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अखेर एफडीए आयुक्तांची बदली

By admin | Updated: June 6, 2017 06:06 IST

एफडीए आयुक्त हर्षदीप कांबळे यांची उद्योग विभागात विकास आयुक्त म्हणून बदली करण्यात आली

अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एफडीए आयुक्त हर्षदीप कांबळे यांची उद्योग विभागात विकास आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे, तर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवपदी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘लोकमत’मध्ये एफडीए मधील नियमबाह्य कामकाजाविषयी वृत्तमालिका प्रसिद्ध झाली होती. विरोधी पक्षनेत्यांनी या वृत्तमालिकेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.एफडीएमधील दक्षता विभाग संपुष्टात आणणे, सचिव आणि मंत्र्यांना कोणतीही माहिती न देता केंद्राच्या कायद्यात बदल करणे या सगळ्या प्रकाराची ‘लोकमत’ने माहिती प्रकाशित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले होते. अद्याप एफडीएला कोणाची नियुक्ती केलेली नाही. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्याविषयीदेखील वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्यांची बदली राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून आबासाहेब जऱ्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योग विभागाचे विकास आयुक्त विजय सिंघल यांना देखील मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. आदिवासी विभागाच्या सहसचिवपदी एस. वाय. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी आर.व्ही. निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालेगाव महापालिकेचे आयुक्त आर.एस. जगताप यांना मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या ‘होम टाउन’ नागपुरात नेले असून ते आता नागपूर विभागीय आयुक्तालयात अतिरिक्त विभागीय आयुक्त असतील. सहकार विभागात काही महिन्यापूर्वी पाठवण्यात आलेल्या जगदीश पाटील यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. सहकार खाते मिळाल्याबद्दल ते नाराज होते. त्यांना आता कोकण विभागीय आयुक्त म्हणून पाठवण्यात आले आहे.अन्य बदल्यांमध्ये दुग्ध विकास व पशुसंवर्धन सचिवपदी व्ही.व्ही. देशमुख, चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी जयश्री भोज, लॉटरी आयुक्तपदी निपुण विनायक यांचे आदेश काढण्यात आले आहेत. सांगली जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची संचालक भूजल सर्व्हेक्षणपदी पाठवण्यात आले असून फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही.एन. काळम यांना सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले आहे. बी.एस. कोळसे यांना नियोजन विभागात सहसचिवपदी, गडचिरोलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांना अकोला जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तर ए.डब्ल्यू. काकडे यांना पुणे म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमण्याचे आदेश काढण्यात आले आहे.>मंत्र्यांना अंधारात ठेवून बदल्या केल्या!एफडीए मधील सहायक आयुक्त अन्न, सहायक आयुक्त औषध, अन्न सुरक्षा अधिकारी व औषध निरीक्षक यांच्या बदल्या एफडीए आयुक्तांनी ३१ मे रोजी केल्या. मात्र, त्याची कोणतीही माहिती मंत्री गिरीश बापट यांना व त्यांच्या कार्यालयाला दिली गेली नाही. ही माहिती मंत्री कार्यालयास देणे आवश्यक होते, पण ५ जून रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत आम्हाला ही माहिती मिळालेली नाही, ती तातडीने सादर करा, असे लेखी आदेश मंत्री कार्यालयाने आयुक्तांना पाठवले. आता आयुक्तांची बदली झालेली नाही, त्यामुळे त्यांनी परस्पर केलेल्या बदल्यांचा फेरआढावा घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.