कल्याण : नव्याने निर्माण झालेल्या दोन प्रभागांत अधिकारी न नेमल्याने नागरीसुविधांचा बोजवारा उडाल्याची बातमी बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत आयुक्त ई. रवींद्रन यांनी त्या प्रभागांत दोन अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. प्रशासनात मोठे फेरबदल करताना अकार्यक्षम ठरलेल्या प्रभाग अधिकाऱ्यांची इतरत्र बदली केली आहे. प्रभाग अधिकारीपद समकक्ष म्हणून सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी महापालिकेत आहेत. असे असतानाही लेखापाल अथवा अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे प्रभाग अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. बुधवारी झालेल्या फेरबदलातही पुन्हा दोन सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची प्रभाग अधिकारी म्हणून वर्णी लागली आहे. केडीएमसीत दोन नवीन प्रभागांची भर पडली आहे. त्यामुळे प्रभागांना १ ते १० क्रमांक देण्यात आले आहेत. आधीच्या ‘ड’ आणि ‘ई’ प्रभागांचे विभाजन करून दोन नवे प्रभाग निर्माण करण्यात आले. या प्रभागांच्या अध्यक्षपदासाठी नुकत्याच निवडणुका झाल्या. परंतु, नव्या प्रभागांत अधिकाऱ्यांच्या नेमणुका न झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी दिले होते. तसेच अन्य प्रभागांतील अकार्यक्षम ठरलेल्या प्रभागक्षेत्र अधिकारी पाहता त्यांच्या जागी महिलांना प्राधान्य देणार असल्याचे म्हटले होते. ते वृत्तही खरे ठरले आहे. ‘ग’ प्रभाग अधिकारी मधुकर शिंदे यांची ‘सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, कल्याण’ या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ग प्रभागातील प्रभागक्षेत्र नंबर ८च्या अधिकारी म्हणून ‘ब’ प्रभाग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक स्वाती गरूड यांची नेमणूक केली आहे.मालमत्ता व्यवस्थापकाची जबाबदारी करनिर्धारक व संकलक अनिल लाड यांना दिली. तर, मनपा मुख्यालयातील लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक श्वेता सिंगासने यांना ‘फ’ प्रभागातील प्रभागक्षेत्र क्रमांक ८ ची जबाबदारी दिली आहे. तेथील अधिकारी भरत जाधव यांची कल्याण फेरीवाला नियंत्रण पथकाचे आणि समाजविकास अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. बीएसयूपीचे सदस्य सचिव व सहायक आयुक्त प्रकाश ढोले यांच्याकडे प्रभाग अधिकारी म्हणून नव्या प्रभाग क्षेत्र क्रमांक ४ (जे) ची जबाबदारी आहे. त्यांच्या जागी लेखा विभागातील विनय कुलकर्णी यांची नियुक्ती झाली. अधीक्षक अशोक संसारे यांच्याकडे नवीन प्रभाग क्षेत्र क्रमांक ९ (आय) ची प्रभाग अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. (प्रतिनिधी)>कुमावत यांची उचलबांगडीडोंबिवलीतील ‘ह’ प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत यांचीही उचलबांगडी झाली आहे. त्यांची रवानगी सचिव कार्यालयात झाली आहे. तेथील चंद्रशेखर वेश्वीकर यांना नवीन प्रभाग क्रमांक १० (ई) येथील प्रभाग अधिकारी म्हणून नेमले आहे. कुमावर यांच्या जागी समाजविकास अधिकारी व मालमत्ता व्यवस्थापक गणेश बोराडे यांची ‘ह’ प्रभाग अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. >वानखेडे यांना अभयविशेष म्हणजे, सुनील पाटील, प्रभाकर पवार आणि अरुण वानखेडे या कल्याणमधील प्रभाग अधिकाऱ्यांना मात्र अभय मिळाले आहे. त्यांच्याकडील जबाबदाऱ्या कायम ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत वानखेडे यांना रुस्तारुंदीकरणात अनधिकृतपणे झालेल्या वाढीव बांधकामप्रकरणी निलंबितकरा, असे आदेश देण्यात आले होते. मात्र, आयुक्तांनी त्यांना केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे.
अखेर ‘त्या’ प्रभागांत अधिकारी
By admin | Updated: June 30, 2016 03:23 IST