शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कोयना प्रकल्पग्रस्तांची घेतली दखल

By admin | Updated: August 2, 2016 02:48 IST

कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे वेगवेगळ्या ठिकाणी नावापुरते पुनर्वसन झाले आहे.

कळंबोली : कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे वेगवेगळ्या ठिकाणी नावापुरते पुनर्वसन झाले आहे. मात्र आजही ही गावे पायाभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात वेगवेगळ्या संघटना गेल्या काही वर्षांपासून सरकारकडे पाठपुरावा करीत असल्या तरी त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. याबाबत मराठा समाज सेवा संघाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र देवून अन्यायाला वाचा फोडली होती. त्यानुसार मुख्य न्यायाधीशांनी राज्य शासनाला आदेश दिले होते. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. १९५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील ८२ गावे कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे बाधित झाली. शासनाने त्यांचे पुनर्वसन रायगड, ठाणे, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि पालघर जिल्ह्यात केले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांना शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. यामध्ये पर्यायी १६ एकर जमिनीचे वाटप, दोन व्यक्तींना शासकीय नोकरी, विविध प्रकारच्या १३ नागरी सुविधा, मोफत वीज पुरवठा आदी आश्वासने देण्यात आली होती. मात्र इतक्या वर्षांनंतरही आश्वासनांची पूर्तता न झाल्याने प्रकल्पग्रस्त अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठा समाज सेवा संघ नवी मुंबईचे अध्यक्ष मुकुंद कदम यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश आठ मंत्र्यांना निवेदन दिले होते. या पत्राची मुख्य न्यायाधीशांनी दखल देत शासनाने याबाबत पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली. >आझाद मैदानावर धरणेसातारा येथील धरणात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी मंगळवार, २ आॅगस्ट रोजी आझाद मैदानावर एल्गार पुकारला आहे. त्यांना इतर जिल्ह्यातील उपेक्षित असलेले कोयना पुनर्वसितांकडून पाठिंबा देण्यात आला आहे.