ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांची वैद्यकीय शिक्षण संचालनालयात हंगामी सरसंचालकपदी तात्पुरती पदोन्नती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मात्र डॉ. लहाने यांनी ही हंगामी पदोन्नती नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
डॉ. लहाने यांच्याविरोधातील विविध तक्रारींमुळे गेल्या वर्षभरापासून त्यांना जे.जे. रुग्णालयातून हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. लहाने यांच्याकडे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदासह वैद्यकीय शिक्षण संचालनालयात सहसंचालाकाचा कार्यभार देण्यात आला होता. अखेर आज त्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले.