शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला, ९ दिवसानंतर संघाने व्यक्त केला शोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 20:01 IST

एकीकडे विश्व हिंदू परिषदेने या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र मौन राखले होते.

ऑनलाइन लोकमतनागपूर : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. एकीकडे विश्व हिंदू परिषदेने या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र मौन राखले होते. अखेर हल्ल्याला ९ दिवस उलटून गेल्यानंतर संघाने शोक व्यक्त केला आहे. मात्र यावेळी कुठलाही संताप किंवा कठोर कारवाई करण्याची मागणी करणारी भाषा टाळण्यात आली आहे. संघाच्या या भूमिकेवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.१० जुलै रोजी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात एकूण आठ नागरिकांचा जीव गेला होता. देशभरातील विविध संघटनांनी याबाबत निषेधाचा सूर लावला. विश्व हिंदू परिषदेने तर यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीकेची तोफ डागली. संघातर्फे मात्र १८ जुलै रोजी याबाबत शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांचे वक्तव्य संघातर्फे जारी करण्यात आले. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रा वर्षानुवर्षे निरंतर सुरू आहे. दरवर्षी यात्रेकरूंची संख्या वाढत आहे. यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला होणे तसेच बस दरीत कोसळून भक्तांचा जीव जाणे या दुर्दैवी घटना आहेत. संघ या यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण करीत आहे. मरण पावलेल्या यात्रेकरूंच्या कुटुंबीयांप्रति शोक व सांत्वना व्यक्त करतो, असे डॉ. वैद्य यांनी जारी केलेल्या वक्तव्यात नमूद आहे. संघाने याअगोदर झालेल्या विविध दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी कडक शब्दात निंदा केली आहे तसेच दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची भाषादेखील बोलण्यात आली आहे. मात्र आता केंद्रात संघ परिवाराची सत्ता आहे. अशास्थितीत संघाने अतिशय मवाळ भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या असून, केंद्र किंवा प्रशासनावर टीका करणे तसेच कारवाईची भाषा टाळली आहे.