शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पीडितेचा अखेर २४ आठवड्यांनंतर गर्भपात

By admin | Updated: July 28, 2016 01:36 IST

अर्भक ‘अ‍ॅबनॉर्मल’ असल्यामुळे गर्भधारणा होऊन २४ आठवडे होऊनही सर्वाेच्च न्यायालयाने बलात्कार पीडितेला गर्भपात करण्याची परवानगी दिली. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर

मुंबई : अर्भक ‘अ‍ॅबनॉर्मल’ असल्यामुळे गर्भधारणा होऊन २४ आठवडे होऊनही सर्वाेच्च न्यायालयाने बलात्कार पीडितेला गर्भपात करण्याची परवानगी दिली. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कूपर रुग्णालयात मंगळवारी गर्भपाताची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बुधवारी सकाळी नैसर्गिकरीत्या पीडितेचा गर्भपात झाला आहे.प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याने गर्भधारणा झालेल्या मुंबईतील पीडितेला गर्भपात करायचा होता. कायद्यानुसार २० आठवड्यांपर्यंतच गर्भपात करण्याची मुदत आहे. या पीडितेला गर्भधारणा होऊन २० आठवडे उलटल्यामुळे मुंबईतील डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला होता. अर्भक ‘अ‍ॅबनॉर्मल’ असल्याचे तपासणीमध्ये कळल्यानंतर गर्भपाताच्या परवानगीसाठी पीडितेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वाेच्च न्यायालयाने पीडितेची तपासणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात या पीडितेची संपूर्ण तपासणी करण्यात आली होती. हा तपासणी अहवाल सोमवार, २५ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. यानंतर गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली. पीडितेला सोमवारी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती स्थिर असल्यामुळे मंगळवारी गर्भपाताची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. बुधवारी सकाळी नैसर्गिकरीत्या पीडितेचा गर्भपात झाला. तिला पुढचे दोन ते तीन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कूपर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या प्राध्यापक डॉ. रीमा वाणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गर्भपाताचा अहवाल महापालिका प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. अविनाश सुपे आणि राज्य सरकारकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (प्रतिनिधी)