शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
2
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
3
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
6
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
7
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
8
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
9
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
10
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
11
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
12
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
13
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
14
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
15
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
16
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
17
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
18
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
19
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
20
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू

तब्बल १९ वर्षानंतर लोणार सरोवरातील ऐतिहासिक "सासू सुनेच्या विहिरीचे" दर्शन

By admin | Updated: May 12, 2017 13:53 IST

 सासु सुनेची विहीर तब्बल 19 वर्षानी सरोवराचे पाण्यामध्ये घट झाल्याने उघड झाली आहे.

लोणार : लोणार सरोवराला त्रिवेणी संगम असे म्हटल्या जाते या ठिकाणी वैज्ञानिक , ऐतीहासीक , व पौराणीक असे संबोधले जाते याच त्रिवेणी संगमामध्ये असलेली पौराणीक कथेमध्ये  असलेली  सासु सुनेची विहीर तब्बल 19 वर्षानी सरोवराचे पाण्यामध्ये घट झाल्याने उघड झाली आहे.लोणार सरोवर हे जागतीक किर्तीचे सरोवर म्हणुन प्रसिध्दी आहे या ठिकाणी त्रिवेणी संगम पाहावयास मिळते तो म्हणजे उल्का पडल्यामुळे लोणार हे सरोवर तयार झाले त्यामुळे यास वैज्ञानिक दृष्टीने पाहील्या जात आहे  , तर लोणार नगराचा पहीला संदर्भ ऋग्वेदमध्ये आला असल्यामुळे या ठिकाणी विष्णुचे मुख्य 10 अवतार असल्यामुळे या शहराला पौराणीक असे सुध्दा संबोधल्या जाते तर ऐतीहासीक म्हणुन सम्राट अशोकाच्या साम्राज्यात लोणार असल्याचे अनेक ठिकाणी नोंद असल्यामुळे लोणार सरोवरास त्रिवेणी संगम म्हणुन ओळखल्या जाते अशा त्रिवेणी संगमापैकी एक संगम म्हणजे पौराणीक कथेनुसार पुराणमध्ये लोणार सरोवरामध्ये कमळजा देवीचे मंदीर आहे पौराणीक कथरेनुसार अगस्ति ऋषीची पत्नी लोपमुद्राने राम वनवासात आले असता सितेची ओटी देवीने भरली होती तसेच तपश्चर्या केली होती ही भक्ताना पावन होनारी देवी आहे मोठया मोठया संतानी व ऋषीनी तपश्चर्या केली व त्यांना देवीनं दर्शन दिले मराठवाडा , खानदेश, विदर्भ मधील ब-याच कुळाची ही कुलदेवता आहे मंदीरासमारे एक विहीर आहे तिला योनी कुंड (सौभाग्य तिर्थ)असे सुध्दा संबोधल्या जाते त्या कुंडास सासु सुनेची विहीर सुध्दा म्हटल्या जाते यामध्ये सासु सुनेची विहीरी म्हणजेच एकाच विहीरीतील पाण्याची चव ही वेगवेगळी असुन देवीकडील बाजुची चव ही गोड असल्यामुळे तिला सुनेंची विहीर तर सरोवराकडील विहीरीतील पाणी खारट असल्यामुळे तिला सासुची विहीर असे सुध्दा बोलल्या जाते अशा आगळया वेगळया विहीर गेल्या 19 वर्षापासुन पाण्यामध्ये बुडाली होती मात्र गत ४ वर्षापासून झपाट्याने खालावत चाललेल्या लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत यावर्षी अजुनच वाढ झाली. वाढत्या तापमानामुळे व अपुरया पावसामुळे पाण्याची पातळी किमान १0० फुट कमी झाली. ही विहीर सन १९९८ मध्ये सहजगत्या दृष्टीस पडली होती, मात्र सरोवराच्या पाण्याची पातळी अचानक पणे वाढल्यामुळे ही  विहीर परत पाण्यात लुप्त झाली.मात्र गेल्या ४ वर्षापासून आटत चाललेल्या पाण्याच्या पातळी मुळे ही "सासुसुनेची विहीर" गेल्या ८ दिवसांपासून पुर्णपणे पाण्याच्या पातळी वर आलेली आढळली.त्यामुळे सरोवरातील ऐतीहासीक पुराणौकाळामध्ये नोंद असलेली सासुसुनेची विहीरीचे दर्शन आजच्या युवकाना होत आहे