शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास जाणाऱ्यांकडून घेतली शपथपत्रे

By admin | Updated: December 29, 2016 16:59 IST

वाशिम जिल्हा परिषद स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे.

ऑनलाइन लोकमतशिरपूर जैन ( वाशिम ), दि. 29 - वाशिम जिल्हा परिषद स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. यासाठी विविध उपक्रमही ते राबवित आहेत. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाईसुद्धा करीत आहे. आता एक नवाच प्रयोग त्यांनी केला असून, मालेगाव तालुक्यातील विविध गावांत उघड्यावर शौचास जाणाऱ्यांकडून पुन्हा अशी चूक न करण्याचे शपथपत्रच गुड मॉर्निंग पथक लिहून घेत आहे. जिल्हा परिषदेच्या स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाकडून गावागावात स्वच्छता अभियानाबाबत वेगवेगळे उपक्रम राबवून जनतेला शौचालय बांधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांनी मालेगाव तालुक्यात गुरुवारी सकाळी विविध गावांत भेटी दिल्या. यावेळी उघड्यावर शौचास जाताना आढळलेल्या लोकांना त्यांनी समज दिली. यावेळी शिरपूर जैनसह शेलगाव बगाडे, शेलगाव खवणे येथे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांकडून पुन्हा ही चूक होणार नाही, अशा आशयाचे शपथपत्रच त्यांनी लिहून घेतले आणि त्यानंतरही उघड्यावर शौचास जाताना आढळल्यास मुंंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ११५ मधील क, ख, ग व कलम ११७ नुसार दंडाची कारवाई करण्याचा इशाराही त्यांना देण्यात आला आहे. यावेळी गुड मॉर्निंग पथकासोबत ग्रामसेवक संजय बेदरे, गजानन दहात्रे, अमोल राजे, भगवान सोमटकर, भागवत भुरकाडे, निवास पांडे, वाहनचालक अफसरभाई हे उपस्थित होते.