शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

वकीलपत्रासाठी राज्यातून वकील सरसावले

By admin | Updated: September 26, 2015 01:39 IST

ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाड याचे वकीलपत्र घेण्यासाठी हिंदू विधिज्ञ परिषदेने वकिलांची फौज उभी केली आहे,

सांगली : ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाड याचे वकीलपत्र घेण्यासाठी हिंदू विधिज्ञ परिषदेने वकिलांची फौज उभी केली आहे, तशीच फौज पानसरेंच्या कुटुंबियांचे वकीलपत्र घेण्यासाठी व सरकार पक्षाला सहाय्य करण्यासाठी उभी करण्यास शुक्रवारी सांगलीतून सुरुवात झाली.सांगलीतून तब्बल ७० वकिलांनी वकीलपत्र घेतल्याची कागदपत्रे सही करून अ‍ॅड. के. डी. शिंदे, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी आणि अ‍ॅड. अमित शिंदे यांच्याकडे दिली आहेत. गेल्या आठवड्यात कोल्हापूर पोलिसांनी सनातन संस्थेचा साधक समीर याला सांगलीतून अटक केली. दोन दिवसांपूर्वी समीरच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवून घेण्यासाठी त्यास पुन्हा न्यायालयात उभे केले होते. त्यावेळी समीरच्या बाजूने ‘सनातन’ने ३१ वकील न्यायालयात उभे केले होते.पुरोगामी संघटनांनी पानसरे यांचे कुटुंब व सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्यासाठी वकिलांची फौज उभी करण्याचा निर्णय घेतला. सांगलीसह राज्यातील सर्व वकील संघटनांशी त्यांनी संपर्क साधून वकीलपत्र घेण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई, नवी मुंबई, यवतमाळ, नागपूर, अकोला या जिल्ह्यांतील वकिलांनी पानसरे कुटुंब व शासनातर्फे वकीलपत्र घेणार असल्याची तयारी दर्शविली आहे. किमान तीनशेहून अधिक वकील वकीलपत्र घेतील, असा अंदाज अ‍ॅड. शिंदे यांनी व्यक्त केला. जमा होणारी वकीलपत्रे शिंदे कोल्हापुरातील न्यायालयात सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)देशात अनेक हिंदू अतिरेकी संघटना उभ्या राहिल्या आहेत. या देशातील हिंदू असुरक्षित आहेत का, याचे उत्तर संघटनांनी द्यावे, असे आव्हान देत कायद्याच्या चौकटीबाहेर असणाऱ्या सर्वच संघटनांवर बंदी घातली पाहिजे, असे मत भारिप-बहुजन महासंघाचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत व्यक्त केले. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ‘सनातन’वाल्यांचा संबंध उघड केला आहे. पोलीस त्यांचे कोम्बिंग आॅपरेशन का करीत नाहीत, असा सवालही त्यांनी केला. प्रकाश आंबेडकरही सहभागीभारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही शुक्रवारी सांगलीत आल्यानंतर वकीलपत्रावर सही करून ते अ‍ॅड. शिंंदे यांच्याकडे दिले.