शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर न्यायालयात वकिलांचा राडा

By admin | Updated: August 27, 2016 01:26 IST

विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन देऊनही एका वकिलाला पौड पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ शिवाजीनगर न्यायालयात वकिलांनी गोंधळ घातला.

पुणे : न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन देऊनही एका वकिलाला पौड पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ शिवाजीनगर न्यायालयात वकिलांनी गोंधळ घातला. अटक बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांना सोमवारी न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले. अ‍ॅड. आकाश मारणे यांच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. मारणे यांनी अटकपूर्व जामीनही मंजूर आहे. असे असताना पोलीस उपनिरीक्षक एन. एस. मोरे यांनी मारणेंच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत मारणेला हजर राहण्यास सांगत मारहाण केली होती. ते हजर झाल्याशिवाय वडिलांना सोडणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली. जेव्हा मारणे गेले तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली. अ‍ॅड. दुशिंग यांनीही पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून मारणेंना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याचे सांगितले होते. पोलिसांना माहिती देऊनही मारणेंना अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.या सर्व प्रकारामुळे शिवाजीनगर न्यायालयातील संतप्त झालेले वकील उपनिरीक्षक मोरे यांना मारहाण करण्याच्या मन:स्थितीत होते. परंतु, अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, अ‍ॅड. गिरीश शेडगे, अ‍ॅड. एन. डी. पाटील, अ‍ॅड. मिलिंद पवार आदी वरिष्ठ वकिलांनी स्वत: संरक्षण देत मोरे यांना न्यायालयात नेले. मारणे यांनी अर्ज करून आपली अटक बेकायदा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मारणे यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या वकीलपत्रावर १५० पेक्षा अधिक वकिलांनी सह्या केल्याचे अ‍ॅड. दुशिंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाने उपअधीक्षकांना नोटीस बजावली असून मारणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.