शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेसाठीही सल्लागार कंपनी

By admin | Updated: July 13, 2017 00:59 IST

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेसाठी महापालिकेच्या वतीने सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेसाठी महापालिकेच्या वतीने सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. स्थायी समितीने या विषयाला मान्यता दिली असून प्रकल्प खर्चाच्या १ टक्का रक्कम यासाठी कंपनीला दिली जाईल. या कामासाठी आलेल्या तीनपैकी एका निविदेला स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली.समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. ही योजना विविध चार गटांमध्ये राबविण्यात येणार असून सर्व गटांचे मिळून ९३ हजारांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्यासाठी महापालिका ठिकठिकाणी भूखंड शोधत आहे. दरम्यान यासाठीचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी म्हणून सल्लागार कंपनी नियुक्त करणे गरजेचे आहे. या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यांतील सर्वांत कमी म्हणजे १ टक्का शुल्क आकारणाऱ्या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठीही सल्लागार कंपनी नियुक्त करण्याचा प्रस्ताव दिला होता; मात्र तो पुढे ढकलण्यात आला. शहरातील भटक्या श्वानांसाठी त्यांचे निर्बीजीकरण करण्याचा विषय होता. त्याला प्रत्येक श्वानामागे ६७५ रुपये याप्रमाणे मंजुरी देण्यात आली. अशी शस्त्रक्रिया केल्यानंतरही शहरातील श्वानांची संख्या वाढतच असल्याने त्यांच्यासाठी शहराच्या काही भागांमध्ये संगोपन केंद्र सुरू करण्याचा विचार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.महमंदवाडी (हडपसर) येथे वारकरी भवन बांधण्याचा प्रस्ताव नगरसेवक नाना भानगिरे यांनी दिला होता. तो मंजूर करण्यात आला. त्यासाठी १ कोटी रुपये तरतूद आहे. शहराच्या अन्य भागातही वारकरी भवन बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी पुढील अंदाजपत्रकात तरतूद केली जाईल, अशी माहिती मोहोळ यांनी दिली. काही सदस्यांनी वर्गीकरणाचे प्रस्ताव दिले होते; मात्र ते प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. कमला नेहरू रुग्णालयात जळीत रुग्णांसाठी एक स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे. ।वाहतूक शाखेसाठी देण्यात आलेल्या १४८ वॉडर्नचे तीन महिन्यांचे वेतन थकले होते. त्यासाठी १ कोटी रुपये वर्ग करून देण्यात आले आहेत. मात्र, आता ही व्यवस्था महापालिकेने करावी किंवा नाही, याबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर पुढील बैठकीत चर्चा होईल, असे अध्यक्ष मोहोळ यांनी सांगितले.