शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिक्षकाकडून शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार

By admin | Updated: May 8, 2016 21:02 IST

जि. प. प्रा. शाळेतील प्राथमिक शिक्षक विलास ऊर्फ बापू मसरे याने इयत्ता चौथीच्या वर्गातील तीन मुलींवर तब्बल सात महिने लैंगिक अत्याचार केले

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 8- मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथे जि. प. प्रा. शाळेतील प्राथमिक शिक्षक विलास ऊर्फ बापू मसरे याने इयत्ता चौथीच्या वर्गातील तीन मुलींवर तब्बल सात महिने लैंगिक अत्याचार केले आहेत. हा प्रकार ऑगस्ट २0१५ पासून फेब्रुवारी २0१६ पर्यंत चालू होता. याबाबत एका पीडित मुलीच्या आईने मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी विलास मसरे यास अटक केली आहे. त्याला रविवारी पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी हजर करण्यात येणार आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकवर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे १९ वर्ष सेवा शिक्षकी पेशात कार्यरत असलेल्या विलास मसरे यास २0१३ साली आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, १ मे २0१६ रोजी एका पीडित मुलीच्या घरी तिच्या दोन मैत्रिणीसह त्या गप्पा मारत होत्या. यावेळी शिक्षक कसा त्रास देत आहे, शिक्षक किती वाईट आहे, याबद्दलची चर्चा फिर्यादीने ऐकली. यावर तिने त्या सर्व मुलींशी चर्चा केली. त्यानंतर पतीबरोबर चर्चा करून तिने शनिवारी सकाळी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. कॉम्प्युटर रूममध्ये हा शिक्षक मुलींना बोलावून घेऊन कॉम्प्युटरवर गेम खेळण्यास देत होता. त्यानंतर मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता. या मुली घाबरुन कुणालाच काही सांगत नव्हत्या. शेवटी हा प्रकार माहीत झाल्यानंतर मुलीच्या आई-वडिलाने मन खंबीर करून पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचा निर्णय घेतला.

त्याप्रमाणे त्यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवेढा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. ३७६ (२), (१), बाललैंगिक अत्याचार २0१२ कलम ५ (फ), ५ (एफ), ५ (एम) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हारुण शेख हे अधिक तपास करत आहेत.