शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी ६ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश

By admin | Updated: June 28, 2016 00:51 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर झाली

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर झाली असली तरी पहिल्या दिवशी केवळ ६ हजार ३९९ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. त्यामुळे सोमवारी अकरावी प्रवेशास थंड प्रतिसाद मिळाला. मात्र, प्रवेश मिळूनही ५० रुपये शुल्क न भरून आपला प्रवेश निश्चित न करणारे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जाणार आहेत. त्यामुळे पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना येत्या ३० जूनपर्यंत प्रवेश घ्यावाच लागणार आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या ७३ हजार ३८५ जागांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून आॅनलाइन प्रवेशासाठी ७३ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी सकाळी १०.३० वाजता जाहीर करण्यात आली. पहिल्या गुणवत्ता यादीतून ५२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आजपासून संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे अपेक्षित होते. मात्र, केवळ ६ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी प्रवेश घेतला. तब्बल ४६ हजार १९३ विद्यार्थ्यांनी प्रवेशास प्रतिसाद दिला नाही.सर्व विद्यार्थ्यांना केवळ आॅनलाइनच प्रवेश दिले जाणार आहे. मात्र, काही विद्यार्थी आॅफलाइनने प्रवेश घेण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी आॅनलाइन प्रवेशास विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, शहरातील काही नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली होती. फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान, कला, वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी स्वतंत्र वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे तपासून मगच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. गरवारे, एस. पी. कॉलेज व मॉडर्न महाविद्यालयातही विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली होती. काही महाविद्यालयात प्रवेश शुल्क भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. (प्रतिनिधी)>आॅनलाईन प्रवेशप्रक्रियागेल्या काही वर्षांपासून अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. यंदा प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ आॅनलाइन पद्धतीनेच प्रवेश दिला जाणार आहे. शिक्षण विभागाकडून अकरावीचा आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना सुमारे एक महिन्याचा कालावधी दिला होता. तरीही काही विद्यार्थ्यांनी अर्ज भरला नसल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयात सोमवारी तीन सुशिक्षित पालक आले होते. आमच्याकडून मुलाचा आॅनलाइन अर्ज भरायचा राहून गेला. आता आम्हाला प्रवेश कसा मिळेल, याबाबत त्यांनी विचारणा केली. त्यामुळे यंदाही आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे.