शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅडमिशनच्या नावावर उकळले २१ लाख

By admin | Updated: January 16, 2017 03:16 IST

एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून ठाण्यातील तिघांना सुमारे २१ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे

ठाणे : नवी मुंबई, कामोठे येथील महाविद्यालयात एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून ठाण्यातील तिघांना सुमारे २१ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गंडा घालणारा भामटा सध्या पोक्सो गुन्ह्याखाली न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.उपवन येथील पोळीभाजी केंद्र चालवणारे राज मिलिंद कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत, पाचपाखाडी, पाटीलवाडीतील सुयोग भोईर याने त्यांना व त्यांचा भाचा विजय शिरसाठ आणि त्यांच्या ओळखीच्या प्रकाश चोळेकर यांचा मुलगा धीरज यास कामोठे, नवी मुंबई येथील एमजीएम कॉलेजमध्ये एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळवून देतो, असे सांगितले. त्यानुसार, भोईर याने आपल्याच घरी त्यांच्याकडून दोन टप्प्यांत २० लाख ५० हजार रुपये घेतले.हा प्रकार आॅगस्ट २०१५ ते आॅक्टोबर २०१६ दरम्यान घडला. पैसे देऊनही अ‍ॅडमिशन मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी शुक्रवारी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)>गंडा घालणाऱ्या सुयोग यांच्याविरोधात २०१६ मध्ये पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्याला अटक केली आहे. त्यामुळे तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याच्याविरोधात नौपाडा पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. तसेच फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्याचा ताबा मिळावा, यासाठी मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत.