निरनिराळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला वेग : विद्यार्थ्यांसोबत पालकांची धावपळनागपूर : एखादी परीक्षा झाली अन् निकाल लागला म्हणजे सर्व सार्थकी लागले असे होत नाही. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना ‘अॅडमिशन’च्या अग्निदिव्यातून जावे लागते. दहावी-बारावीच्या निकालानंतर आता प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. उपराजधानीतील निरनिराळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे. काही अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे तर काहींची सुरू होणार आहे. एकूणच हा आठवडा उपराजधानीतील बहुतांश विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा म्हणता येईल. आठवड्याच्या सुरुवातीला ‘मिशन अॅडमिशन’वर ही एक नजर.आजपासून ‘मिशन अभियांत्रिकी’राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून २३ जूनपासून याला प्रारंभ होणार आहे. राज्यभरातील शासकीय व सरकारी महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया ‘कॅप’ मार्फत राबवली जाईल. मोठ्या प्रमाणावर रिक्त राहणाऱ्या जागा भरण्याचे मोठे आव्हान यंदा महाविद्यालयांसमोर आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३ जुलै आहे. ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या २३,७०२ जागा आहेत.अकरावीसाठी अखेरची संधीअकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीतर्फे राबविण्यात आलेल्या प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांसाठी सोमवारी शेवटची संधी राहणार आहे. आतापर्यंत कला, वाणिज्य, विज्ञान आणि द्विलक्षी अभ्यासक्रमांसाठी ६५ हजारांहून अधिक अर्जांची विक्री करण्यात आली आहे. अर्जविक्री व अर्ज स्वीकृतीसाठी शनिवार २१ जून ही अखेरची तारीख होती. परंतु विद्यार्थी व पालकांच्या मागणीवरून दोन दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली. कुणी प्रवेश देता का प्रवेश?विद्यापीठाकडून सर्वात अगोदर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणे अपेक्षित असते. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने लावलेल्या ५० टक्के शिक्षक भरतीच्या अटीमुळे नुकतेच बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अक्षरश: हैराण झाले आहेत. महाविद्यालयांनी आर्थिक नुकसान नको म्हणून विनाअनुदानित तुकड्यांच्या जागांवर प्रवेश देणे थांबविले असून त्यामुळे ८० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयांत प्रवेशासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. प्रवेशासाठी महाविद्यालयांत गेल्यावर त्यांना नकारघंटा मिळत आहे. त्यामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांकडून ‘कुणी प्रवेश देता का प्रवेश’ असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. प्रमुख तारखाअभियांत्रिकी २३ जून ते ३ जुलैपॉलिटेक्निक २७ जून ते ६ जुलैअकरावी १७ जून ते २३ जूनअभियांत्रिकीचे वेळापत्रकआॅनलाईन अर्ज दाखल करणे २३ जून ते ३ जुलैकागदपत्रांची पडताळणी २३ जून-३ जुलैतात्पुरती गुणवत्ता यादी ५ जुलैअंतिम गुणवत्ता यादी ९ जुलै
अ...‘अॅडमिशन’चा!
By admin | Updated: June 23, 2014 01:30 IST