शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रुपीचा प्रशासकीय कारभार वाढणार !

By admin | Updated: June 10, 2014 00:49 IST

विलिनीकरणाचा नवीन प्रस्ताव नाही : खातेदारांना करावी लागणार प्रतिक्षा

विलिनीकरणाचा नवीन प्रस्ताव नाही : खातेदारांना करावी लागणार प्रतिक्षा पुणे : रुपी बँकेकडे विलिनीकरणासाठी सध्या कोणत्याही सक्षम बँकेचा पर्याय नाही. त्यातच बँकेच्या प्रशासकीय कालावधीची मुदत २२ ऑगस्ट रोजी संपत आहे. रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) चौथ्यांदा बँकेच्या प्रशासकीय कालावधीची मुदत वाढवावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे खातेदार-ठेवीदारांनी आणखी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. आर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने २२ फेब्रुवारी २०१३ रोजी रुपी बँकेवर निर्बंध घातले आहेत. तेव्हापासून प्रशासकांची मुदत तीनदा वाढविण्यात आली आहे. बँकेच्या तत्कालिन प्रशासकीय मंडळाने बँकेच्या विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरु केले होते. सारस्वत बँकेने त्यासाठी उत्सुकता दाखविली होती. त्याप्रमाणे आर्थिक पडताळणी देखील केली होती. मात्र बँकेने सुरुवातीस खातेदारांना त्यांच्या खात्यातील रक्कमेपैकी ६५ टक्के (६५:३५) रक्कम देण्याचा प्रस्ताव दिला होता. उर्वरीत रक्कम थकीत कर्जाची वसुली झाल्यानंतर खातेदारांना देण्यात येणार होती. मात्र खातेदारांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. दरम्यान बँकेचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प आहे. कर्मचार्‍यांचे वेतन व प्रशासकीय खर्च मात्र सुरु आहे. त्यामुळे बँकेच्या तोट्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या हा तोटा तब्बल ६१३ कोटींच्या घरात पोहचला आहे. विलिनीकरणाच्या ६५-३५ प्रस्तावाला होत असलेला विरोध व विलिनीकरण लांबल्याने रुपीच्या तोट्यात होत असलेली वाढ यामुळे सारस्वत बँक विलिनीकरणाच्या स्पर्धेतून मागे पडल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपुर्वी अलाहाबाद बँकेशी विलिनीकरणाची बोलणी सुरु होती. अलहाबाद बँकेने आर्थिक पडताळणी अहवालासाठी त्यांच्या संकेतस्थळावर निविदा देखील प्रसिद्ध केली होती. मात्र त्यांचा आर्थिक पडताळणी अहवाल गुलदस्त्यात आहे. रुपी बँकेच्या प्रशासकांनी काही राष्ट्रीयकृत बँकांशी विलिनीकरणाबाबत बोलणी सुरु केली आहे. एका बलाढ्य बँकेने त्यासाठी उत्सुकता दाखविली आहे. मात्र हा प्रस्ताव अगदी प्राथमिक अवस्थेत आहे. या बँकेने जरी विलिनीकरणाची इच्छा व्यक्त केली तरी आरबीआयची परवानगी, संचालकमंडळ व सभासदांची मंजुरी यासाठी काही महिन्यांचा अवधी लागू शकतो. बँकेच्या प्रशासकीय मंडळाची मुदत २२ ऑगस्टरोजी संपत असल्याने प्रशासकीय कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे.