शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

‘लोकमत’च्या दणक्याने प्रशासनाला जाग

By admin | Updated: June 22, 2016 00:45 IST

महापालिकेतील नगर विकास आणि बांधकाम विभागाचे कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू असते, याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी (दि.२०) स्टिंग आॅपरेशन केले होते.

पिंपरी : महापालिकेतील नगर विकास आणि बांधकाम विभागाचे कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू असते, याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी (दि.२०) स्टिंग आॅपरेशन केले होते. याबाबत सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली. यामुळे या दोन्ही विभागांचे कार्यालय मंगळवारी कार्यालयीन वेळेतच बंद करण्यात आले. तसेच संत तुकाराममहाराज यांच्या अभंगाचे दृकश्राव्य करण्यासाठी महापालिकेने ५० लाखांची तरतूद केली होती. याबाबतही ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन महापालिकेला हा ठराव रद्द करावा लागला. नव्याने ठराव करून यासाठी ५ लाखांचीच तरतूद करावी लागली. ‘लोकमत’च्या वृत्ताची महापालिका प्रशासनाला दखल घ्यावी लागली. कार्यालयांना वेळेतच टाळेपिंपरी : महापालिकेतील बांधकाम परवाना विभाग आणि नगररचना विभागात नियमबाह्य कामे कार्यालयीन वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याबाबत लोकमतने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. यावरून महासभेत वादळी चर्चा झाली. यासह महापौरांनीही कारवाईचे आदेश दिले. लोकमतच्या या दणक्यानंतर आता या दोन्ही विभागांच्या कार्यालयांना सहा वाजताच ‘टाळे’ लागत आहे. बांधकाम परवानगी आणि नगररचना या विभागात जी कामे दिवसा करणे शक्य होत नाहीत, अशा नियमबाह्य कामांना सायंकाळनंतर सुरुवात होते. यावर आधारित ‘फाइल मंजुरीसाठी रात्रीस खेळ चाले’ हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. यानंतर महापालिका प्रशासन हडबडले. सोमवारच्या महासभेतही या मुद्द्यावरून वादळी चर्चा झाली. नगरसेवकांनी सभागृहात लोकमतच्या वृत्ताचे वाचन करीत या विभागाच्या कामकाजाची चौकशी मागणी केली. महापौरांनीही या दोन विभागात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या कामकाजाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. मनसेचे टाळ बजावो आंदोलनपिंपरी : तुकोबारायांचे अभंग अर्थासहित दृकश्राव्य करण्यासाठी पाच लाख रुपये दाखवून पन्नास लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थायी समितीच्या गैरकारभाराच्या निषेधार्थ मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टाळ बजावो आंदोलन केले. याबाबत मनसेने आयुक्त दिनेश वाघमारे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, श्री संत तुकाराममहाराज यांचे अभंग दृकश्राव्य पद्धतीने सोशल मीडियावर तसेच डिजिटल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली स्थायी समितीने प्रस्तावावर पाच लाख रुपये खर्च दाखवून पन्नास लाखांच्या खर्चास मंजुरी घेतली. ही जनतेच्या पैशांची लूट आहे. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने विषय मंजूर करू नयेत, अशी मागणी करण्यात आली. यासह स्थायी समितीच्या या गैरकारभाराच्या निषेधार्थ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थायी समिती सभापतींचे कार्यालय तसेच आयुक्त कार्यालयासमोर टाळ बजाओ आंदोलन केले. या आंदोलनात मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, मनविसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, रूपेश पटेकर, अंकुश तापकीर, मयूर चिंचवडे, राजू सावळे, तानाजी चांदणे, ज्योती गोफणे आदींचा समावेश होता. तुकोबारायांचे अभंग दृकश्राव्य करण्यासाठी पाच लाख रुपये दाखवून पन्नास लाख लाटणाऱ्या शब्द क्रिएशन या संस्थेला दिलेले काम रद्द करावे, अशी मागणी धनंजय आल्हाट यांनी आयुक्तांकडे केली आहे. पाच लाखांचे ५० लाख करण्याचा डाव फसलापिंपरी : तुकोबारायांचे अभंग अर्थासहित दृकश्राव्य करण्यासाठी पाच लाख रुपये दाखवून पन्नास लाखांचा विषय स्थायीने मंजूर करवून घेतला आहे. हा गैरकारभार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर स्थायी समितीने अखेर हा चुकीचा ठराव रद्द करणे भाग पडले. यामुळे पाच लाख खर्चाचा प्रस्ताव दाखवून ५० लाख रुपये लाटण्याचा स्थायी समितीचा डाव फसला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा मोबाइलद्वारे तसेच डिजिटल मीडियाद्वारे ऐकावयास मिळावी, यासाठी अभंगगाथा दृक्श्राव्य करण्यासाठीच्या विषयास १४ जूनच्या स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळच्या विषयाद्वारे मान्यता देण्यात आली होती. यासाठी ४५८६ अभंग निवडले. मात्र, या प्रस्तावाच्या खर्चाचे आकडे अक्षरी व अंकी यात तफावत होती. ही बाब लोकमतने दिलेल्या वृत्ताने सर्वांच्या निदर्शनास आली. या प्रस्तावास कडाडून विरोध झाला. त्यामुळे पन्नास लाखांचा प्रस्ताव पाच लाखांवर आला. अखेर अभंग दृकश्राव्य करण्यासाठी येणाऱ्या पाच लाखांचा नवीन ठराव करून मंजूर करण्यात आला.

अगोदरच्या ठरावात प्रत्येक अभंगाचे ध्वनिमुद्रण, ध्वनिसंपादन, स्टुडिओ रेंटसाठी ४०० रुपये, तसेच प्रत्येक अभंगासाठी कलाकारास मानधन म्हणून तीनशे रुपये, व्हिडीओ संपादनासाठी प्रत्येकी तीनशे रुपये, तसेच प्रूफरिडिंगसाठी प्रतिअभंग ११० रुपये असे एकूण एका अभंगासाठी एक हजार ११० रुपये खर्च येत असून, चार हजार ५८६ अभंगांसाठी ५ लाख ९ हजार ४६० रुपये खर्च दाखविण्यात आला होता. अभंगांची संख्या पाहता ही रक्कम पन्नास लाखांवर जात होती. (प्रतिनिधी)