शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचा आठवड्यातून एकदा खादी डे

By admin | Updated: May 21, 2016 05:34 IST

राज्यातील सचिवस्तरीय अधिकारी आठवड्यातील एक दिवस खादीचे कपडे घालून कामावर येणार आहेत.

यदु जोशी,

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये खादी वापरण्याबाबत केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील सचिवस्तरीय अधिकारी आठवड्यातील एक दिवस खादीचे कपडे घालून कामावर येणार आहेत. पुढील आठवड्यापासून स्वत: मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय या उपक्रमाची सुरुवात करणार आहेत.यासंदर्भात क्षत्रिय यांनी गुरुवारी सचिवांची बैठक घेतली. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आपण सर्वांनी किमान आठवड्यातून एक दिवस खादीचे कपडे परिधान करावेत, असे आवाहन त्यांनी केले. ते स्वत:देखील आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालणार असल्याचे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले. त्यावर सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला. केंद्र सरकारने विविध राज्यांच्या राज्यपालांना खादीबाबत आवाहन करणारे पत्र पाठविले आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना आलेले पत्र शासनाकडे पाठविले असून प्रशासनाने त्याची तत्काळ दखल घेतली. राज्याच्या प्रशासनाचे कर्णधारच खादी घालणार म्हटल्यानंतर आता विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी त्याचे अनुकरण करतील आणि आठवड्यातून एक दिवस का होईना पण खादीमय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.आश्रमशाळेत मुक्कामनिवासी आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भेटीला आता लवकरच मोठ्ठे साहेब येणार आहेत. ते साहेब त्यांच्याबरोबर जेवतील, राहतील आणि संवादही साधतील. मुख्य सचिवांसह अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव हे एक दिवस या आश्रमशाळांत घालविणार आहेत. लवकरच त्याचे वेळापत्रक ठरेल.मुख्य सचिवांसह विविध विभागांचे सचिव येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद, खासगी शाळांमध्ये एक दिवस व्यतित करणार आहेत. तेथील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या अडचणी समजावून घेऊन तसा अहवाल मुख्य सचिवांना सादर करतील.-आठवड्यातून एक दिवस खादी वापरण्याची सक्ती केलेली नाही. हा निर्णय ऐच्छिक आणि स्वयंस्फूर्त आहे. सचिवस्तरीय अधिकारी थेट विद्यार्थ्यांसोबत जाऊन राहिल्याने समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल. सरकार शिक्षणासारख्या मूलभूत सुविधेकडे किती गांभीर्याने पाहते हे तर दिसेलच पण शैक्षणिक सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे. - स्वाधिन क्षत्रिय, राज्याचे मुख्य सचिव