शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर केला स्वयंपाक

By admin | Updated: July 25, 2016 05:10 IST

आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येथील आदिवासी मुला- मुलींच्या चारही वसतीगृहातील विद्यार्थ्यांची

गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येथील आदिवासी मुला- मुलींच्या चारही वसतीगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी मंजूर झालेली नाही. तसेच भोजन कंत्राटाचे दर मंजूर झाले नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या वसतीगृहाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी रविवारी वसतीगृहासमोर रस्त्यावर स्वत:च स्वयंपाक शिजवून भोजन केले.यावर्षी महाविद्यालये २७ जूनपासून सुरू झाल्यानंतर अनेक जुने विद्यार्थी वसतिगृहात राहायला आले. २१ जुलैपर्यंत सर्व सुरळीत होते. मात्र अचानक प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या सूचनेवरून लांझेडा येथील वसतिगृहाच्या अधीक्षिकेने व काही कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी १४ मुलींना वसतिगृहाबाहेर काढले. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीमुळे शुक्रवारच्या रात्री १४ मुलींना वसतिगृहात ठेवण्यात आले. मात्र त्यानंतर शनिवारी सकाळी वसतिगृहातील मुला-मुलींना भोजन देण्यात आले नाही. वसतिगृहातील जुन्या व नवीन विद्यार्थ्यांची प्रवेश यादी मंजूर झालेली नाही. तसेच भोजन कंत्राटाचे दर मंजूर झाले नाही, असे सांगून प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वतीने वसतिगृहातील सर्व मुला- मुलींना स्वगावी परतण्यास सांगण्यात आले. चारही वसतीगृह बंद करण्यात आल्याने येथील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांनी गडचिरोलीचे आ. डॉ. देवराव होळी यांची भेट घेऊन त्यांना आपबिती सांगितली. त्यानंतर आ. डॉ. होळी यांनी पोटेगाव मार्गावरील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नधान्य, भांडी व गॅस शेगडी उपलब्ध करून दिले. मात्र प्रकल्प कार्यालयाकडून वसतीगृहात भोजन तयार करण्याची मनाई करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच स्वयंपाक केला. वसतीगृहात राहण्यास प्रकल्प कार्यालयाने मनाई केल्यामुळे अनेक विद्यार्थी स्वगावी परतले आहेत. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)