शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

आदिवासी योजनेतील भ्रष्टाचार नष्ट करणार

By admin | Updated: November 16, 2014 00:48 IST

शासनातर्फे आदिवासींच्या योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. परंतु हा पैसा कुठे जातो हा गंभीर प्रश्न आहे. यापुढे असे चालणार नाही. आदिवासी योजनांमधील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांची घोषणा : ‘मॉनिटरी सिस्टीम’ लागू करणार नागपूर : शासनातर्फे आदिवासींच्या योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. परंतु हा पैसा कुठे जातो हा गंभीर प्रश्न आहे. यापुढे असे चालणार नाही. आदिवासी योजनांमधील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यात येईल. योजनेत पारदर्शकता आणली जाईल. त्यासाठी योजना राबविताना ‘मॉनिटरी सिस्टीम’ लागू केली जाईल. इतकेच नव्हे तर आदिवासींचा पैसा हा आदिवासींपर्यंतच पोहोचविला जाईल. जो अधिकारी कर्मचारी आदिवासींचा पैसा त्यांच्यापर्यंत पोहचू देणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्यासाठी कठोर कायदे केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. क्रांतिसूर्य भगवान वीर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मुल निवासी सुधार महासंघद्वारा फुटाळा चौक येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांना बिरसा मुंडा यांचे प्रतीक म्हणून तीर कमान असलेले स्मृतिचिन्ह भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी महापौर व भाजपा आदिवासी आघाडीच्या राष्ट्रीय सचिव माया इवनाते या अध्यक्षस्थानी होत्या. महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, कृष्णराव चव्हाण, नवनितसिंग तुली, मनपा आयुक्त श्याम वर्धने, चिंतामण इवनाते आदी व्यासपीठावर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बिरसा मुंडा यांनी अतिशय अल्पकाळात आदिवासींसाठी मोठे काम केले. ज्या काळात जमिनदार आणि इंग्रज अशा दोन्ही बाजूंनी आदिवासींची पिळवणूक सुरु होती, त्या काळात बिरसा मुंडा यांनी लढा उभारला. तो लढा खऱ्या अर्थाने आदिवासींचा मुक्तीचा लढा होता. बिरसा मुंडा यांनी दिलेला लढा आणि संघर्षातून आदिवासींना त्यांचे हक्क मिळाले. वनजमिनीवर आदिवासींचा कायद्याने हक्क आहे. परंतु हा हक्क केवळ कागदावरच शिल्लक होता. परंतु आपण त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. आदिवासी योजना आदिवासींपर्यंत प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच बिरसा मुंडा यांनी सुरू केलेला मुक्तीचा लढा आदिवासींनी पुन्हा सुरू करावा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी आ. सुधाकर देशमुख यांनी आदिवासींसाठी बिरसा मुंडा यांच्या नावाने नागपुरात समाजभवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. माया इवनाते यांनीसुद्धा जागेची मागणी करीत बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची विनंती केली. अमित कोवे यांनी प्रास्ताविक केले. संचालन संजय बंगाले यांनी केले. नगरसेवक परिणय फुके, श्रीकांत देशपांडे, सुरेंद्र सावरकर, अ‍ॅड. मनिराम मडावी, पंकज आत्राम, कृष्णराव परतेकी, राजमाता राजेश्वरी देवी आदी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)बिरसा मुंडा यांच्या नावावर नागपुरात समाजभवन आदिवासी समाजासाठी नागपुरात बिरसा मुंडा यांच्या नावावर समाजभवन उभारण्यात येईल. त्यासाठी मनपाने जागेचा शोध घ्यावा. त्यासंबधीचा प्रस्ताव मनपाने शासनाला पाठवावा शासन लगेच मंजुरी प्रदान करेल. तसेच बिरसा मुंडा यांचे चरित्र हे अतिशय प्रेरणादायी आहे, त्यामुळे ते शालेय स्तरावर उपलब्ध करण्यात येईल. यासाठी आपण स्वत: शिक्षणमंत्र्यांना सांगू, असे आश्वासनसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.