शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

अतिरिक्त शिक्षक मुंबईतच राहणार!

By admin | Updated: September 19, 2016 05:30 IST

मुंबईतील शिक्षकांचे समायोजन मुंबईतच करू, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक परिषदेला दिले आहे.

मुंबई : संचमान्यतेमुळे अतिरिक्त झालेल्या मुंबईतील शिक्षकांचे समायोजन मुंबईतच करू, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक परिषदेला दिले आहे. अतिरिक्त शिक्षकांचे पगार बंद होणार नाहीत, अशी स्पष्टोक्तीही तावडे यांनी दिली. अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नांवर रविवारी तावडे यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये ही आश्वासने मिळाल्याचा दावा शिक्षक परिषदेने केला आहे.शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे म्हणाले की, अतिरिक्त शिक्षकांचे वेतन बंद होणार असल्याची चर्चा शिक्षकांत होती. मात्र ही केवळ अफवा असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईसह राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता निश्चिंत राहण्याचे आवाहनही त्यांनी परिषदेच्या मार्फत केले आहे. समायोजन प्रक्रियेत अन्याय झाल्यास शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे दाद मागावी. शिवाय नियमबाह्य पद्धतीने शिक्षकांना अतिरिक्त दाखविल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्याचे निर्देशही शिक्षण विभागाला दिल्याचे शिक्षणमंत्र्यांनी परिषदेला सांगितले. शिक्षक समायोजन प्रक्रियेत चांगल्या व घरानजीकच्या शाळा मिळविण्यासाठी गैरव्यवहार होत असल्याची तक्रार आली होती. मात्र प्रक्रिया आॅनलाइन केल्याने समायोजनेत पारदर्शकता आली आहे. तरी यापुढे गैरव्यवहार होणार नाही, त्यामुळे शिक्षकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.