शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या झळांबरोबरच पुणेकरांना वाहतूककोंडीचेही ‘चटके’

By admin | Updated: April 5, 2016 01:00 IST

एका बाजूला रखरखत्या उन्हामुळे शहरातून गाडी चालविणेही कठीण झालेल्या पुणेकरांना सोमवारी शहरातील प्रमुख रस्त्यावर ऐन दुपारी झालेल्या वाहतूककोंडीचाही मोठा फटका सहन करावा लागला.

पुणे : एका बाजूला रखरखत्या उन्हामुळे शहरातून गाडी चालविणेही कठीण झालेल्या पुणेकरांना सोमवारी शहरातील प्रमुख रस्त्यावर ऐन दुपारी झालेल्या वाहतूककोंडीचाही मोठा फटका सहन करावा लागला. त्यामुळे अवघे अर्धा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी जवळपास तासभर वेळ जात असल्याने पुणेकर घामांच्या धारांनी हैराण झाल्याचे दिसून आले. प्रामुख्याने आरटीओ कार्यालय, जुना बाजार चौक परिसरातील वाहतूक नियंत्रण दिवे बंद असल्याने मंगळवार पेठ, जिल्हाधिकारी कार्यालय, विद्यापीठ रस्ता, पुणे-मुंबई रस्ता, आरटीओ कार्यालयासमोरील रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर संध्याकाळी जंगली महाराज, फर्ग्युसन रस्ता, आपटे रस्ता, शिवाजी रस्ताही कोंडीने गजबजला होता. विशेष म्हणजे ही कोंडी फोडण्यासाठी एका-एका चौकात चार ते पाच पोलिसांची नेमणूक केली असतानाही, वाहनचालक त्यांना न जुमानता लेन कटिंग करून विरुद्ध दिशेने वाहने चालवून वाहतूककोंडीस जबाबदार ठरत असतानाही वाहतूक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत हतबल झाल्याचे दिसून आले. सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात रिक्षाचालकांचे आंदोलन असल्याने वाहतूक नियोजनासाठी या परिसरातील सिग्नल पोलिसांकडून बंद करण्यात आले होते. त्यामुळे वाहतूक पोलीसच चौकांचे नियोजन करताना दिसून येत होते. मात्र, वाहनचालक त्यांना जुमानत नसल्याचे चित्र सर्व चौकात होते. त्यामुळे पोलिसांनी थांबण्याचे आदेश देऊनही अनेक वाहनचालक सुरळीत वाहतुकीच्या मध्येच गाड्या घालून या कोंडीत भर घालताना दिसून आले. त्यामुळे गाडीतळ आणि आरटीओ चौकात झालेल्या कोंडीने काही वेळातच पुणे स्टेशन, रुबी हॉस्पिटल, पुणे विद्यापीठ तसेच मुंबईकडे जाणारा रस्ता आणि जुना बाजार रस्ता काही वेळातच ब्लॉक झाला. त्याचा परिणाम पुढे या रस्त्याला जोडणारे रस्तेही हळूहळू कोंडीने भरून गेले. जवळपास दोन ते तीन तास ही कोंडी ऐन दुपारी म्हणजे दीड ते साडेतीन या वेळेत झाली. त्यामुळे या कोंडीत अडकलेल्या नागरिकांना अक्षरश: उन्हाच्या चटके सहन करत ताटकळत राहावे लागले.