शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

कणकवलीचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश करा

By admin | Updated: August 5, 2015 00:12 IST

नीतेश राणे : मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कणकवली : केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेमध्ये कणकवलीचा समावेश करा, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कणकवली शहर हे आर्थिकदृष्ट्या विकसित होणारे आणि नाशिक शहरापेक्षा जास्त दरडोई उत्पन्न असलेले शहर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वसलेले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले कणकवली हे महत्त्वपूर्ण शहर असून, स्मार्ट सिटी योजनेसाठी अग्रक्रमाने विचार करावा, असे आमदार राणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.कणकवली शहराची लोकसंख्या १६ हजार ३५८ एवढी आहे. या शहराला लागून जानवली, कलमठ, हळवल, आशिये मठ, वागदे अशी गावे वसलेली आहेत. मध्यवर्ती ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या कणकवली शहराला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पार्श्वभूमी आहे. या शहराची मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, येथे अनेक सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या निर्माण होत आहेत. स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून शहरातील वाहतूक, आरोग्य, शिक्षण, मलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन अशा पायाभूत सुविधांचे योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे. तळकोकणातील कणकवली शहराचा या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यास शहराचा विकास अधिक जोमाने होईल. येथील जनतेला दर्जेदार नागरी सुविधा देता येतील. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी कणकवली शहराची शिफारस करावी, असे आमदार राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी)