शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख
4
"शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ म्हणणारे गावी पळाले"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
5
ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड
6
५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'
7
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
8
मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत यांच्यातील वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा?
9
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
10
शाळेतील शौचालयात विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ!
11
"रोहित शर्माला संघाबाहेर ठेवण्यासाठीच ब्राँको टेस्ट आणलीये..."; माजी क्रिकेटरचा गंभीर आरोप
12
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
13
अजय गोगावलेने गायलं 'देवा श्री गणेशा', रणवीर सिंहने फुल एनर्जीसह केला डान्स; व्हिडिओ व्हायरल
14
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
15
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
16
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
17
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
19
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
20
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न

‘अदानी’, ‘गोल्डन’चा खाद्यतेलाचा १ कोटीचा साठा ताब्यात

By admin | Updated: October 22, 2015 01:16 IST

दोघांवर गुन्हा : जिल्हा पुरवठा विभागाची धडक कारवाई; २९५ परवानाधारकांच्या दुकाने, गोदामांवर छापे

कोल्हापूर : खाद्यतेल, डाळ आणि खाद्यतेल बियांचा मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा असल्याच्या संशयावरून जिल्हा पुरवठा विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील २९५ परवानाधारकांच्या दुकाने, गोदामांवर बुधवारी छापे टाकले. त्यात अदानी विल्मर लिमिटेड व गोल्डन व्हॅली अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या उजळाईवाडी (ता. करवीर) येथील भाडेतत्त्वावरील गोदामात एकत्रित सुमारे १ कोटी रुपयांच्या खाद्यतेलाचा अतिरिक्त साठा सापडला. पुरवठा कार्यालयाने जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत संबंधित कंपनींवर कारवाई करण्यासाठी या खाद्यतेलाचा साठा ताब्यात घेतला. याबाबत या कंपनीसह गौतम अदानी (रा. अहमदाबाद, गुजरात आणि अमर पूनम भट, रा. टाकाळा, कोल्हापूर) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक मनोज पाटील यांनी फिर्याद दिली आहे.केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्यांतर्गत जारी केलेल्या नियंत्रण आदेशाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून छापे टाकण्याची कारवाई करण्यात आली. त्यात उजळाईवाडी (ता. करवीर) येथील अदानी विल्मर लिमिटेड व गोल्डन व्हॅली अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या भाडेतत्त्वावरील गोदामावर छापा टाकला. या कंपनींकडून कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांना खाद्यतेल, बेसन, वनस्पती तेल आणि तांदळाची विक्री केली जाते. या कंपन्यांचे दोन परवाने आहेत. त्याअंतर्गत त्यांना खाद्यतेलाचा एकत्रितपणे ६०० क्विंटलपर्यंत साठा करता येतो. मात्र, याठिकाणी छापा टाकल्यानंतर ११८६.४२ क्विंटल इतका खाद्यतेलाचा साठा आढळला. संबंधित खाद्यतेलाचा साठा अनुज्ञप्ती मर्यादेपेक्षा अतिरिक्त होता. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी संबंधित कंपन्यांचे गोदाम सील करण्यासह खाद्यतेलाचा अतिरिक्त साठा पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतला. शिवाय या कंपन्यांवर जीवनावश्यक वस्तू ‘अधिनियम कलम ७’ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार योगेश खरमाटे यांना दिले. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुरवठा कार्यालयाने दिवसभरात जिल्ह्णातील २९५ परवानाधारकांच्या दुकाने, गोदामांवर छापे टाकले. मात्र, त्यात २९४ ठिकाणी मर्यादित साठा आढळून आला. या कारवाईने खळबळ उडाली. दरम्यान, अदानी विल्मर लिमिटेडचे विक्री प्रतिनिधी अमर भट्ट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी रत्नागिरी दौऱ्यावर असून कारवाई झाल्याचे समजले. याबाबत गुरुवारी सकाळी कंपनीतील अन्य सहकाऱ्यांकडून माहिती घेईन, स्टेटमेंट पाहीन त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल. कंपनीचे गोदाम व्यवस्थापक शिवाजी बुराण यांनी या कारवाईची माहिती वरिष्ठांना दिली असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)मॉल्समध्ये मर्यादित साठाजिल्हा पुरवठा विभागाने कोल्हापुरातील सहा आणि इचलकरंजीतील दोन मॉल्सची अचानक तपासणी केली. त्यासह जिल्ह्णातील २९५ परवानाधारकांची दुकाने, गोदामांवर छापे टाकले. यात राधानगरी तालुक्यात १२६ छापे, चंदगड १५, कागल ४०, शिरोळ ९, पन्हाळा १०, भुदरगड १४, शाहूवाडी ९, इचलकरंजी ८, कोल्हापूर शहर ११, हातकणंगले ९, करवीर १४, गडहिंग्लज ३० या छाप्यांचा समावेश आहे. मॉल्ससह तालुकानिहाय छापे टाकलेल्या ठिकाणी अतिरिक्त साठा आढळला नाही. या कारवाईमध्ये तहसीलदार योगेश खरमाटे, शहर पुरवठा अधिकारी दिलीप सणगर, पुरवठा निरीक्षक सतीश ढेंगे, करवीरचे पुरवठा निरीक्षक मनोज पाटील, अमोल बोलाईकर, अमर साळोखे, बाबासो माळी, आदींसह जिल्ह्णातील तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, प्रांताधिकारी, नायब तहसीलदार यांनी कारवाई केली.नागरिकांनी माहिती द्यावीखाद्यतेल, डाळ आणि खाद्यतेल बियांचा मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा असल्याच्या संशयावरून जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्णातील २९५ परवानाधारकांच्या दुकाने, गोदामांवर बुधवारी छापे टाकले. यात अदानी विल्मर लिमिटेड व गोल्डन अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड येथे अनुज्ञप्ती मर्यादेपेक्षा खाद्यतेलाचा अतिरिक्त साठा आढळल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी सांगितले. ते म्हणाले, खाद्यतेलाचा हा साठा सुमारे ९५ लाख रुपयांचा आहे. अतिरिक्त साठा केल्याप्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये या कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. शिवाय ‘परवाना रद्द’ची कारवाई केली आहे. अदानी व गोल्डन या कंपन्यांची गोदामे वगळता छापा टाकलेल्या अन्य ठिकाणी खाद्यतेल, डाळींचा अतिरिक्त साठा आढळला नाही. जिल्ह्णात खाद्यतेल, डाळींचा अतिरिक्त साठा कुणी व्यापारी, वितरकाने ठेवल्याचे समजल्यास नागरिकांनी त्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाला ०२३१-२६५५५७९ या क्रमांकावर द्यावी.कंपनींकडून या तरतुदींचे उल्लंघनजीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ३ अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या महाराष्ट्र अनुसूचित वस्तू घाऊक व्यापार अनुज्ञाप्ती आदेश १९९८ च्या परिच्छेद दहा, अकरा व पंधरामधील तरतुदी. महाराष्ट्र डाळी, खाद्यतेल आणि खाद्यतेल बिया (साठा निर्बंध) आदेश २०१० च्या सुधारणा आदेशानुसार डाळी, खाद्यतेल बिया आणि खाद्यतेल (साठा निर्बंध) आदेश १९७७ च्या परिच्छेद चार. केंद्र सरकारकडील १८ आॅक्टोबर २०१५ साठा निर्बंधांबाबतची अधिसूचना. या तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे जीवनावश्यक वस्तू अधिनियम १८६६ च्या कलम ७ अन्वये संबंधित कंपनींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी सांगितले.कोल्हापुरात बुधवारी जिल्हा पुरवठा विभागाने साठेबाजीच्या संशयावरून परवानाधारकांची दुकाने, गोदामांवर छापे टाकले. या अंतर्गत शहरातील मॉल्समध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, तहसीलदार योगेश खरमाटे खाद्यतेल, डाळी यांच्या साठ्यांची तपासणी केली.