शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्म’साठी अभिनेत्री चढली १२ मजले!

By admin | Updated: January 4, 2016 03:31 IST

पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या राष्ट्रीय सन्मानासाठी आपल्या नावाची नेत्यांनी शिफारस करावी म्हणून विविध क्षेत्रातील नामवंतांकडून प्रयत्न केले जातात. मन राखायचे म्हणून नेतेही शिफारसपत्र देऊन टाकतात

नागपूर/ मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या राष्ट्रीय सन्मानासाठी आपल्या नावाची नेत्यांनी शिफारस करावी म्हणून विविध क्षेत्रातील नामवंतांकडून प्रयत्न केले जातात. मन राखायचे म्हणून नेतेही शिफारसपत्र देऊन टाकतात, हे पद्म पुरस्कारामागचे ‘वास्तव’ सांगताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात थेट ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांच्या नावाचा उल्लेख केला. पद्मभूषण मागण्यासाठी आशा पारेख १२ मजले चढून माझ्या घरी आल्या होत्या, असे त्यांनी सांगितले. पद्म किताबासाठी शिफारसपत्र देऊन देऊन अक्षरश: वीट आला असल्याचेही ते म्हणाले. शनिवारी नागपुरात सेवासदनाच्या नागपूर शाखेतर्फे शिक्षण-प्रबोधन पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी गडकरी बोलत होते. कोणत्याही पुरस्कारासाठी जाहिरात दिली जाऊ नये, असे सांगत पुणे सेवासदन सोसायटीनेही पुढील वर्षी या पुरस्कारासाठी जाहिरात देऊन अर्ज न मागवता समाजातील चांगल्या माणसांच्या मदतीने उत्तम काम करणाऱ्या संस्थेची पुरस्कारासाठी निवड करावी, अशी सूचना गडकरींनी केली.पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारासाठी अनेक नामवंत आपल्या नावाची शिफारस करावी म्हणून नेत्यांकडे येतात. अनेकदा नेतेही मन राखायचे म्हणून शिफारसपत्र देतात. मला मात्र असे शिफारसपत्र देऊन देऊन अक्षरश: वीट आला आहे, असे गडकरी म्हणाले. पुरस्कारासाठी नामवंत कसे धडपड करतात, याबाबत त्यांनी आशा पारेख यांच्याबाबतचा किस्सा सांगितला. आशा पारेख यांना पद्मश्री मिळाला आहे. आता पद्मभूषण मिळावा म्हणून त्या मुंबईतल्या माझ्या घरी आल्या होत्या. त्या दिवशी लिफ्ट बंद होती. त्या १२ मजले चढून वर आल्या आणि मला भेटल्या. पद्मभूषण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी गळ त्यांनी घातली, असे गडकरींनी सांगितले.गडकरींचा दावा निरर्थक आहे. मी कधीही ‘पद्म’ मागण्यासाठी त्यांच्याकडे गेले नाही. मला यावर आणखी काहीही बोलायचे नाही, अशी प्रतिक्रिया खुद्द आशा पारेख यांनी दिली.