शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

अभिनेता तुषार कपूरला पुत्ररत्न

By admin | Updated: June 28, 2016 05:31 IST

बॉलीवूड अभिनेता तुषार कपूर याला आठवडाभरापूर्वी पुत्ररत्न झाले आहे.

मुंबई : बॉलीवूड अभिनेता तुषार कपूर याला आठवडाभरापूर्वी पुत्ररत्न झाले आहे. सरोगसीच्या माध्यमातून तुषार कपूरला मुलगा झाला असून, त्याचे नाव ‘लक्ष्य’ ठेवले आहे. बाळाची प्रकृती उत्तम असून, त्याला घरी नेण्यात आले आहे. जसलोक रुग्णालयात या बाळाचा जन्म झाला.तुषार कपूरला बाबा होण्याची इच्छा होती. त्यामुळे लग्न न करता बाबा होण्यासाठी त्याने सरोगसीचा मार्ग स्वीकारला. गेल्या आठवड्यात तुषारच्या बाळाचा जन्म झाला. बाळ जन्माला आल्यावर लगेच रडले. बाळाचे वजन योग्य आहे. प्रकृती चांगली असल्यामुळे तुषार कपूरला बाळाला घेऊन घरी जाण्याची परवानगी दिल्याची माहिती वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. फिरुजा पारेख यांनी ‘लोकमत’ला दिली. तुषार कपूर यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. लग्न न करता आई-वडील होण्याची इच्छा असल्यामुळे त्यांच्या समोर दोन मार्ग होते. त्यातला सरोगसीचा मार्ग त्यांनी स्वीकारला. त्याआधी त्यांनी व्यवस्थित विचार केला होता. त्यांचे समुपदेशन करण्यात आले होते. त्यांनी सर्व कायदेशीर बाबी, कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. त्यानंतरच बाळाला जन्म देण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचेही डॉ. पारेख यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)