अतिग्रे (जि. कोल्हापूर) : पडद्यावरचा ‘सिंघम’ प्रत्यक्ष गावात अवतरलेला आणि तोही मराठमोळा खेळ ‘विटी-दांडू’ खेळण्यासाठी हे पाहण्यासाठी कोल्हापूर पंचक्रोशीतील सगळी तरुणाई गोळा झाली होती. अजय देवगणने विटी कोलली आणि तरुणाईने एकच जल्लोष केला.
अभिनेता अजय देवगणची निर्मिती असलेल्या ‘विटी-दांडू’ चित्रपटाच्या निमित्ताने लोकमत युवा नेक्स्ट, स्टार नमकीन व
संजय घोडावत ग्रुपच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना अजयबरोबरच विटी-दांडू खेळण्याची संधी मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातील अतिग्रे येथील घोडावत इन्स्टिटय़ूटमध्ये हा अनोखा खेळ रंगला. या वेळी अजयने तरुणाईशी संवादही साधला. अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रा. लि. चेअरमन खासदार विजय दर्डा होते. घोडावत ग्रुपचे प्रमुख संजय घोडावत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
तरुणाईचे प्रमुख आकर्षण होते मैदानावर आयोजित खेळाचे. ‘सिंघम’ चित्रपटाच्या टायटल सॉँगच्या ठेक्यावर अजयचे जल्लोषी स्वागत झाले. ‘आता माझी सटकली’, ‘मै सिर्फ एक बार कहूंगा, क्यों की दुसरी बार सुनने के लिए तू जिंदा नही रहेगा’, असा डायलॉग मारताच एकच जल्लोष झाला. ‘लोकमत युवा नेक्स्ट’च्या सभासदांबरोबरच स्पर्धेमधील विजेते गौरव बाविस्कर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, (जळगाव), सूरज आयप्पन (सिम्बायोसिस इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, पुणो), कपिल पाठक (देवगिरी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अॅँड मॅनेजमेंट
स्टडिज, औरंगाबाद) व प्रसाद तावदारे (न्यू कॉलेज, कोल्हापूर) यांचा अजयबरोबर ‘विटी-दांडू’चा खेळ रंगला. त्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला.
एस.जी.आय.चे अध्यक्ष उद्योगपती संजय घोडावत यांनी प्रास्ताविकात इन्स्टिटय़ूटमार्फत विद्याथ्र्याना पुरविण्यात येणा:या सोयी-सुविधांबाबतची माहिती
दिली.
या प्रकारच्या उपक्रमांचे संजय घोडावत ग्रुपतर्फे नेहमीच स्वागत होईल, असे सांगितले. आर.जे. सोनाली यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी लेखक-अभिनेते विकास कदम, दानचंद घोडावत, श्रेणिक घोडावत, विनायक भोसले, संचालक व्ही.ए. रायकर, अनिल कोटेचा, दर्शन घोडावत, विराट गिरी, श्री. वासू, प्राचार्य सस्मिता मोहंती आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अजयचा तरुणाईला संदेश
मिळालेल्या संधीचे सोने करून जीवनातील लक्ष्य गाठा. जीवनात चमकायचे असल्यास शिक्षण महत्त्वाचे.
शिक्षण, प्रशिक्षण आणि मनोरंजनासाठी ‘लोकमत युवा नेक्स्ट’ काम करीत आहे, हे कौतुकास्पद आहे. यातून महाराष्ट्रातील युवकांना नवी प्रेरणा, ऊर्जा मिळत आहे.
तुम्ही देशाचे भविष्य आहात, जीवनात करिअरसाठी शिक्षण आवश्यक आहे. अभ्यासाकडे लक्ष देऊन संधीचे सोने करा. जीवनातील तुमचे लक्ष्य गाठा.
मी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असून, एखादी चांगली कथा मिळाल्यास अभिनयही करेन.